डॉ.विनोद नगराळे यांच्यावरील आरोप तथ्थहीन आरोपीच्या पिंजऱ्यात मनपा प्रशासन

ब्रेकिंग न्यूज :-डॉ.नगराळे यांच्यावर तथ्यहीन आरोप लावणारे मनपा प्रशासन आरोपींच्या पिंजऱ्यात ?

डॉ. नगराळे यांनी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती लपवील्याच्या खोट्या आरोपाखाली त्यांचेवर केली होती कारवाई ? अफवांवर विश्वास ठेवून डॉ. नगराळे यांची पोलिसात तक्रार करणाऱ्या त्या मनपा डॉक्टरांवर गुन्हा दाखल व्हायला हवा, मुंबईतील त्या खाजगी प्रयोगशाळेतील तो रिपोर्ट अवैध, प्रशासनाचा दावा, मग मनपाच्या चुकीच्या कारवाईने म्रुत रुग्णांच्या कुटुंबीयांची व नातेवाईकांची बदनामी झाल्याने नुकसानभरपाई कोण देणारं ? खळबळजनक:-   चंद्रपूर जिल्ह्यात जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार व जिल्हा पोलिस अधिक्षक माहेश्वर रेड्डी यांनी जिल्ह्यात तटस्थ तटबंदी करून कोरोना व्हायरसला जिल्ह्याच्या सीमेवर येवू दिले नाही.एवढेच नव्हे तर जिल्ह्यात आरोग्य प्रशासन व्यवस्था त्यांनी सांभाळत जिल्ह्याला कोरोना व्हायरसपासून संरक्षित केले पण तरीही काही अफवांचे कोरोना विषाणू सगळीकडे पसरले आणि एका रुग्णांचा म्रुत्यु हा निमोनिया व इतर आजाराने झाला त्याचा बाऊ करत जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण होता या अफवांचा बाजार भरला,

खरं तर डॉ. नगराळे यांचे म्रूतक हे नियमित रुग्ण होते. त्या रुग्णाला अनेक छोटे मोठे आजार होते, त्याची नियमित ते तपासणी करायचे. मात्र जेंव्हा हा रुग्ण 21 मार्चला डॉ.नगराळे यांच्याकडे प्रकृती दाखवण्यासाठी आला तेंव्हा त्यांनी सांगितले की मी प्रवासावरून आलोय आणि माझी प्रकृती बिघडली आहे. हे ऐकून डॉ. नगराळे यांनी त्यांना अगोदर जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोना संदर्भात टेस्ट करायला सांगितले. त्यानंतर रुग्णाला जिल्हा सामान्य रुग्णालयात टेस्ट करून औषधोपचार झाला होता. मात्र परत 25 मार्चला त्या रुग्णाला डॉ. नगराळे यांच्या रुग्णालयात भरती करण्यात आले ,या दरम्यान औषधोपचार केल्यानंतर सुद्धा रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा होतं नसल्याने त्यांनी रुग्णाला नागपूर मेडिकल कॉलेज मधे रेफर केले मात्र रुग्णांच्या कुटुंबीयांनी प्रकृती जास्त झाल्याने नागपूर येथील जय देशमुख यांच्या खाजगी रुग्णालयात उपचारार्थ नेले, या दरम्यान त्या रुग्णांची रिपोर्ट निगेटिव्ह होती. पण तिथे सुद्धा रुग्णांची प्रकृती सुधारत नसल्याने डॉक्टरांनी त्या रुग्णाला शेवटी मेयो रुग्णालयात भर्ती करण्या सांगितले आणि अवघ्या दोन तासात त्यांचा जीव गेला. पण कदचित हा रुग्ण कोरोना बाधित असावा म्हणून त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली जी निगेटिव्ह होती. परंतु नंतर खाजगी

डॉक्टर जय देशमुख यांच्या रुग्णालयात शुक्रवारला जे रुग्ण जिवंत असतांना नमुने घेवून मुंबईच्या खाजगी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले ते तब्बल चार दिवसानी आणि पाचव्या दिवशी टेस्ट झाली त्यामुळे ते नमुने हा फार वेळ झाल्यामुळे त्याचा योग्य रिपोर्ट मिळाला नाही, त्यामुळे तो रिपोर्ट ना पॉझिटिव्ह होता ना निगेटिव्ह होता पण त्याचा आधार घेवून प्रसारमाध्यमांनी चुकीची माहिती पसरवून एक प्रकारे जनतेत भ्रम निर्माण केला आणि एका नैसर्गिक म्रुत्यु झालेल्या रुग्णांची संशयित कोरोना बाधित रुग्ण असा उल्लेख करून रुग्णांच्या कुटुंबीयांची बदनामी केली. एवढेच नव्हे तर हा रुग्ण ज्या रहमतनगर चा रहिवासी आहे त्या रहमत नगर येथे पोलिसांकडून जी नियमित मॉकड्रील आकस्मिक परिस्थितीसाठी वेगवेगळ्या भागात जिल्हा पोलिस प्रशासन सज्ज असल्याचे दाखवून देण्यासाठी केली त्या मॉकड्रीलला रहमत नगर शील झाले. तिथे आणखी रुग्ण असल्याचे कळते शिवाय त्या संशयित रुग्णामुळे पुन्हा काही रुग्ण आहे.अशा प्रकारच्या तथ्यहीन बातम्या कुठलीही अधिकृत माहिती न घेता पसरवील्या गेल्या.विशेष म्हणजे त्या दरम्यान आरोग्य विभागाने या संदर्भात आपली भूमिका स्पष्टपणे मांडायला हवी होती. परंतु उलट अफवांच्या व्हायरसची जणू लागण झालेल्या मनपा आरोग्य प्रशासनाने डॉ. नगराळे यांच्या विरोधात पोलिसात तक्रार करून त्यांना होम कोरोनटाईन केले आणि त्या डॉक्टरांवर एक प्रकारे दडपशाही आणली. कुठलीही स्पष्ट वैद्यकीय रिपोर्ट नसतांना मनपा आरोग्य विभागाने कुठल्या आधारावर डॉ. नगराळे यांच्यावर कारवाई केली ? यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून या संदर्भात खरं तर मनपाचे जे कोणी डॉक्टर असेल त्यांच्यावर आता पोलिसात गुन्हेच दाखल करायला हवे. कारण कुठलाही वैद्यकीय विभाग हा अफवांवर विश्वास ठेवत नाही तर त्यांच्या मेडिकल रिपोर्टवर विश्वास ठेवतो आणि जर मनपा आरोग्य विभागाकडे अशी कुठलीही म्रूतक रुग्णांची मेडिकल रिपोर्ट नसतांना डॉ. नगराळे यांच्यावर कुठल्या आधारावर गुन्हा दाखल करून त्यांना होम कोरोनटाईन केले ? याचे उत्तर आता स्वतः मनपा आरोग्य विभाग सुद्धा देवू शकणार नाही. कारण आता म्रूतक रुग्णांचा रिपोर्ट व सोबतच त्यांच्या कुटुंबीयांचा रिपोर्ट हा निगेटिव्ह आला आहे अर्थात या घडामोडींचा वेध घेतला तर जाणीवपूर्वक रुग्णाला, रुग्णांच्या कुटुंबीयांना व त्यांचेवर उपचार करणाऱ्या स्थानिक डॉ. नगराळे यांना बदनाम करण्याचे हे एक छडयंत्र दिसत आहे.
आता हे प्रकरण जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस अधिक्षक यांच्या न्यायालयात जाणार आहे आणि त्यावर काय निर्णय घेतला जाईल याबद्दल जिल्ह्यातील सर्वांना फार उत्सुकता लागली आहे कारण प्रसारमाध्यमांनी ज्या प्रकारे या प्रकरणी कुठलाही वैद्यकीय पुरावा नसतांना बातम्यां रंगवल्या आणि मनपा आरोग्य विभागाने त्या अफवांवर विश्वास ठेवून एका डॉक्टर आणि निरपराध म्रूतक रुग्णांचे कुटुंबीय यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले ते अमानवीय आहे आणि मानवाधिकाराचे हनन करणारे आहे. त्यामुळे मनपा आरोग्य विभागाच्या त्या डॉक्टरांवर गुन्हे दाखल व्ह्यायलाच हवे.