प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेतून आता कोरोना ग्रस्त रूग्णांनाही लाभ

जनआरोग्य योजनेतून आता कोविड ग्रस्त रुग्णांनाही लाभ

रुग्णालयांनी ऑनलाइन पद्धतीने करा अर्ज


चंद्रपूर, दि. 25 एप्रिल: महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत जिल्हातील गरजू,गरीब लाभार्थी रुग्णांकरिता जास्तीत जास्त लाभ देता यावा तसेच भविष्यात कोविड-19 ने ग्रस्त रुग्ण जिल्ह्यात आढळल्यास त्या योजनेचा लाभ देता यावा. या अनुषंगाने जास्तीत जास्त रुग्णालयाने योजनेत सहभागी व्हावे,असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे.

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना हि महाराष्ट्र शासनाची महत्वाकांशी योजना अजून, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत निवडक गंभीर आजारांवर मोफत उपचार व शस्त्रक्रिया अंगीकृत रुग्णालयाच्या मार्फत पुरविण्यात येते. या योजनेअंतर्गत पिवळे, केशरी, अंत्योदय तथा अन्नपूर्णा राशन कार्ड धारक लाभार्थी कुटुंब असुन त्याकरिता योजनेच्या माध्यमातून प्रती वर्ष प्रती कुटुंब रूपये 1.50 लक्षापर्यंतचे आरोग्य विमा संरक्षण उपचार मोफत पुरविण्यात येते.

त्याचप्रमाणे, आयुष्मान भारत -प्रधानमंत्री जन आरोग्य योजना हि केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून राबविण्यात येत असून याअंतर्गत लाभार्थी कुटुंबास प्रती वर्ष 5 लक्षापर्यंतचे आरोग्य विमा संरक्षण पुरविण्यात येते. या योजनेकरिता सामाजिक,आर्थिक व जातनिहाय जनगणना-2011 अंतर्गत यादीत समाविष्ट कुटुंबे या योजनेचे लाभार्थी आहेत. तरी,महाराष्ट्र शासनाने एकत्रित महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना राज्यात रावविण्यात येते आहे. या योजनेअंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत तथा आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेतील समाविष्ट लाभार्थीकरिता 996 व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना लाभार्थ्याकरिता 213 उपचार, शस्त्रक्रियेचा असे एकूण 1209 उपचार तथा शस्त्रक्रियेचा समावेश विविध 34स्पेशालिटी अंतर्गत योजनेत करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे, योजनेअंतर्गत नव्याने समाविष्ट होणाऱ्या रुग्णालयांकरिता काही अटी शिथिल करण्यात आलेल्या अजून त्यात रुग्णालयास 30 बेड व आयसीयू आवशक्यता असून दुर्गम भागाकरिता 20 बेड विथ आयसीयू ‌ असणाऱ्या रुग्णालयाला सुद्धा समाविष्ट करण्यात येत आहेत. तसेच, नव्या नियमानुमार, रुग्णालयाची विभागणी ही फक्त 3 विभागात करण्यात येणार आहे. तरी, इच्छुक रुग्णालयांनी www.jeevandayee.gov.in या वेबसाईटवर योजनेत समाविष्ट होण्याकरिता अर्ज ऑनलाइन पद्धतीने पूर्ण करावेत. इच्छुक रुग्णालयांनी ऑनलाइन अर्ज करतांना बॉम्बे नर्मिग होम ॲक्‍ट (रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट) महाराष्ट्र पोलूशन कंट्रोल बोर्ड (एमपीसीबी) तथा फायर सेफ्टी सर्टिफिकेट (फायर एनओसी) असणे आवश्यक आहे.

योजनेत समाविष्ट होण्याकरिता इच्छुक रुग्णालयांनी अधिक माहिती करीता कोविड-19 चे नोडल अधिकारी तथा इन्सिडन्स कमांडर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.बी. राठोड तथा विभागीय व्यवस्थापक, जन आरोग्य योजना डॉ.सुमित भगत (मो.8275095808) यांच्याशी संपर्क साधावा.