कोरोना रोखण्यासाठी शासनाने केलेल्या सक्त सुचनांचे पालन करा..माजी मंत्री महादेव जानकर

कोरोना विषाणुने जगभरात हातपाय पसरले आहेत. या जागतिक आपत्तिचा सामना करण्यासाठी अखंड भारत देश लॉकडाउन आहे. कोरोना साथ रोगाच्या बचावासाठी सरकारने लोकांना गर्दी टाळणे, घराबाहेर न पडणे, विविध कर्यक्रमावर निर्बंध लागु केले आहेत. आपल्या मार्फत सर्वाना विनंती करण्यात येत आहे की सरकारच्या सर्व सक्त सुचनांचे पालन करावे. कोरोना विषाणु मुक्त राष्ट्र बनवण्यासाठी सहकार्य करावे. या आपतकालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी हातावरचे पोट असणारे मजूर, गरीब, पीडीत, स्थलांतरित कामगार यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. असंख्य कुटुंबाची उपासमार होत आहे. तेव्हा राष्ट्रीय समाज पक्ष पदाधिकारी/ कार्यकर्ते, राष्ट्रीय समाजाला आवाहन करत आहे की, आपल्या वार्ड, तालुका, जिल्हा क्षेत्र, गट, गण, प्रदेशात कायद्याच्या अधीन राहून आवश्यक असणाऱ्या जीवनावश्यक वस्तू, खाद्य पदार्थ, औषध, पाणी आदि उपलब्ध करुन जनतेला दिलासा द्यावा.