कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर जिवनाश्यक वस्तू सर्व सामान्यांना पोहचताहेत का?

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सामान्यांना जिवनावश्यक वस्तू खरोखरचं पोहोचत आहेत काय?
मतलबी स्वार्थी-दळभद्री दलालांचा लाजिरवाणा प्रकार!

कोरोनाने जगभर आपले हातपाय पसरले असून भारतातही कोरोनाने पाय रोवले आहे.त्यामुळे संपूर्ण भारतातील जनजिवन विस्कळीत झाले आहे.कोरोनाला रोखण्यासाठी आठ दिवसापुर्वी संचारबंदी लागू (लाॅकडाॅऊन) करण्यात आली.त्यामुळे सामान्य जनतेवर खुप मोठा परीणाम झाला आहे.सर्व सामान्य जनतेला
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जीवनावश्यक वस्तू चे वाटप सेवाभावी संस्था, राजकीय पुढारी, लोकनेते यांच्या पुढाकाराने सुरू आहे. जीवनावश्यक वस्तू गोर-गरिबांपर्यंत जायला हवे, कोणीही उपाशी राहू नये, देशावर आलेल्या या भयानक संकटात कोणीही पोटा-पाण्यासाठी रस्त्यावर येऊ नये, या सार्थ हेतूने समाजातील सामाजिक जान असलेल्यांनी अशा गरजवंतांना अन्नधान्य व दैनंदिन पुरवठा घरपोच करण्याचे अभिनंदनीय कार्य हाती घेतले आहे. या अभिनंदनीय कार्याला काही स्वार्थी-दळभद्री मध्यस्थानी स्वार्थाचे व स्वत:चे पोट भरण्याचे साधन बनवून समाजसेवेच्या उदात्त हेतूला काळीमा फासत आहेत. रोजच्या जेवणाचे डब्बे निराधार, निराश्रित व गरीबापर्यंत पोहोचविण्याचे कार्य जिल्ह्यात काही दिवसांपासून समाजसेवकांतर्फे केल्या जात आहे. त्यासोबतच गहू, तांदूळ, डाळ अशा जीवनावश्यक वस्तूंचाही पुरवठा या समाजसेवकांतर्फे गरजूंना पोहोचविण्याचे कार्य सुरू आहे परंतु काही मध्यस्थी दळभद्री या जीवनापयोगी वस्तू गरजवंतापेक्षा स्वतःचे नातेवाईक, परिचित व स्वत:साठी ठेवून घेत असल्याचा लाजिरवाणा प्रकार सूरू असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी अनुभवला आहे. संपूर्ण देश व राज्य या संकटातून मार्ग शोधत आहे. या धोक्याला टाळण्यासाठी अनेकांनी राज्य व केंद्राला मदत केली आहे व करत आहेत. जिल्हास्तरावर ही आपापल्या परीने समाजसेवी बांधव, राजकीय पुढारी, समाजसेवक या समस्येचा सामना करीत आहे. हातावर आणून ताटावर खाणाऱ्यांची उपासमार होऊ नये, त्यांच्या कुटुंबात कुणीही उपाशी राहू नये यासाठी आपापल्या स्तरावर सगळेच समाजसेवक कामाला लागली आहेत. परंतु या भयानक स्थितीत ही आपले पोट भरायचे हे साधन मानणाऱ्या काही मतलबी,स्वार्थी दलालांवर नियंत्रणात आणणे गरजेचे आहे. घराबाहेर निघायचे नाही, शासनाच्या आदेश पाळायचा परंतु पोटाचे काय? मुलांचे काय? रोजच्या गरजेचे काय? असे अनेक प्रश्न ज्यांच्या समोर उभे आहेत, त्यांच्या गरजेचे व हक्काच्या वस्तु हिरावण्याचा "मृतांच्या टाळूवरील लोणी खाण्याचा" लाजिरवाणा प्रकाराकडे समाजसेवकांनी जातीने लक्ष घालणे गरजेचे आहे.