संचारबंदीत कुणावरही उपासमारीची वेळ येणार नाही याची काळजी घ्या
चंद्रपूर : कोरोना विषाणूमुळे सध्या देशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. महाराष्ट्रात कोरोनाबाधीतांची वाढणारी संख्या qचताजनक आहे. या गंभीर परिस्थितीत शासनाच्या निधीला हातभार लागावा म्हणून खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी आपल्या स्थानिक विकासनिधीतून प्रत्येकी पन्नास लाख असे एकूण एक कोटी रुपयांची मदत केली आहे.
दरम्यान, गरीब कामगार, बीपीएल, रेशनकार्ड नसलेल्या असंघटित मजूर वर्ग यांची उपासमार होणार नाही याची काळजी काँग्रेस कार्यकत्र्यांनी घ्यावी. काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकारी, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य यांनी आपआपल्या क्षेत्रात जातीने लक्ष देऊन गरजूंच्या याद्या तयार कराव्या. जिल्हा पुरवठा अधिकारी, तहसील कार्यालयातून त्यांना धान्याची मदत करावी, असे आवाहन खासदार बाळू धानोरकर यांनी प्रसिद्धिस दिलेल्या पत्रकात केले आहे. आपआपल्या क्षेत्रातील गरीब कुटुंबीयांची उपासमार होऊ नये. त्यांचे हाल होऊ नये याची जबाबदारी प्रत्येक काँग्रेस कार्यकत्र्यांची आहे. कोरोना या आजाराची जाणीवदेखील नागरिकांना करून देण्याची जबाबदारी काँग्रेस कार्यकत्र्यांची आहे. सध्या संचारबंदी आहे. या राष्ट्रीय समाजपयोगी कार्यात आपला हातभार लावून सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहनही देखील खासदार बाळू धानोरकर यांनी केले आहे.