▪️ Editor - Sanjay Kannawar ▪️ Mobile - 9158399455

आमदार जानकरांच्या त्या आव्हानाने सरकार जागे

 


अहील्यानगर जिल्ह्यातील राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात गावाच्या बाहेर असल्याने रुग्णांना त्याचा रुग्णांना फारसा उपयोग होत नाही.त्यामुळे ग्रामस्थांनी राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार महादेवराव जानकर यांच्या निदर्शनास आणून दिली.राष्ट्रीय समाज पक्षाचे सध्या राज्यात जनसुराज्य यात्रा सुरू आहे.त्या यात्रेत राहुरी येथील ग्रामस्थांना संबोधित करताना रुग्णालयासाठी आपण ग्रामस्थांनी आंदोलन उभे करावे त्या आंदोलनाबाबत मी सरकारकडे  मागणी करीन जर सरकार ऐकले नाही तर स्वतः आंदोलनात सहभागी होईन असे जाहीरपणे आमदार जानकर यांनी सांगितले होते. त्याचा धसका घेत पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या लक्षवेधीत प्रश्न उपस्थित करून रुग्णालय राहुरी शहरात उभारले जाईल त्यासाठी लवकरच बैठक घेण्यात येणार असल्याने आरोग्य मंत्र्यांनी याबत उत्तर दिले.आमदार जानकर यांच्या एका इशाऱ्याने संपुर्ण यंत्रणा कामाला लागल्याने नगर जिल्ह्यातील नागरीकांमध्ये आमदार महादेवराव जानकर यांचे आभार मानले जात आहे.