▪️ Editor - Sanjay Kannawar ▪️ Mobile - 9158399455

अखेर धुमाकूळ घालणाऱ्या वाघीणीचा मृत्यू


  धुमाकूळ घालणाऱ्या वाघीणीचा मृत्यू 

नांदगाव :- मुल तालुक्यातील घोसरी बेबांळ परीसरात वाघीणीने धुमाकूळ घालत अनेकांना जखमी केले. बुधवारच्या रात्री.१२ वाजता वाघिणीने मेंढपाळ कुटुंबावर हल्ला केला या झुंजीत वाघिणीवर प्रतिहल्ला चढवून वाघीणीला परतावून लावत  कुटुंबातील तिघांनी आपला बच्चाव केला,यात मेंढपाळ कुटूंबातील ३ जण जखमी झाले, गुरूवारच्या सकाळी  ५ वाजता येसगाव येथील शेतकरी गणेश भाऊजी सोनूले वय (३७)हा हातात पावडा व कुराड घेऊन शेतात निघाला असता रस्त्यालगत भंजाळी गावाजवळ गणेशवर वाघिणीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला परंतु गणेशच्या हातात कुराड असल्याने तत्परता दाखवून वाघिणीला झुंज देत परतावून लावला.यात गणेश जखमी झाला.तर गुरुवारच्या दुपारी १ वाजता बेंबाळ परिसरातील शिवारात म्हशींच्या कडपात वाघिण घुसली.शिकार म्हणून म्हशींवर हल्ला करण्याच्या प्रयत्न केला.मात्र म्हशींच्या एकीच्या बळाने वाघिणीला झुंज देत म्हशींने वाघिणीला जखमी केल्याचा थरार  लोकांनी अनुभवला. *म्हशी व वाघीनीची थरारक झुंज चित्तरंजक* होती.अनेकांनी हा थरार कॅमेऱ्यात कैद केला.या जखमी झालेल्या वाघीणीचा मृत्यु झाला असून चंद्रपूर व्याघ्र उपचार केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले.