त्या सिटीपीएस रोडच्या कामात शासनाचे वाचले ३० करोड रुपये



चंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशन Chandrapur Thermal Power Station मधील ॲशबंड Ashbund कडे जाणाऱ्या रस्त्यावर ६० कोटी खर्च करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली होती.त्या आधारावर राष्ट्रीय समाज पक्षाचे National Social Party विदर्भ मुख्य महासचिव संजय कन्नावार यांनी संचालक तथा मुख्य अभियंता यांचेकडे तक्रार दाखल करण्यात आली होती.त्या तक्रारीचा धसका घेत ६० कोटी वरून ३० कोटींचे अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले असल्याने राष्ट्रीय समाज पक्षाचे दणक्याने शासनाचे ३० कोटी रुपये बचत झाले आहे.


ॲशबंड (राख डेपो) कडे जाणारा रस्ता हा अंदाजे १० ते १२ कि.मी. आहे. या रस्त्याचे अंदाजे खर्च ३० ते ४० कोटी आहे मात्र विभागाने या रस्त्यांचे अंदाजपत्रक ६० कोटीच्या वर काढले आहे. कोणत्याही महामार्गावर केलेल्या काक्रीटीकरणावर १ कि.मी. अंदाजे २ ते ३ कोटी खर्च होत असल्याचे जाणकारांचे मत आहे. मात्र या विभागाच्या रस्त्यावर १ कि.मी.साठी ५ कोटी लागत असेल तर नवलच आहे आणि या अंदाजपत्रकाला मुख्य अभियंता याचा दुजोरा मिळणे म्हणजे शासनाच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा स्पष्ट धोरण दिसत आहे अश्या आशयाचे निवेदन देण्यात आले होते.या निवेदनाची दखल घेत वरीष्टांनी ६० कोटी रुपयांचे अंदाजपत्रकाला नामंजूर करून आता नव्याने ३० कोटी रुपयांचे अंदाजपत्रकाला मंजूरी देण्यात आली आहे.यामुळे शासनाच्या तिजोरीतील ३० कोटी रुपये वाचविण्यात आले आहे.