▪️ Editor - Sanjay Kannawar ▪️ Mobile - 9158399455

जातींची जनगणना करणे हेच राष्ट्रीय समाज पक्षाचा अजेंडाCensus of Castes is the agenda of Rashtriya Samaj Party Census of Castes is the agenda of Rashtriya Samaj Party



राजकारणाच्या चाबी शिवाय कोणतेही प्रश्न सुटत नाही. तेच लक्षात घेऊन महादेव जानकर यांनी सन २००३ मध्ये राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना केली. राष्ट्रीय समाज पक्षाची निर्मिती करीत असतांना जिस कि जितनी संख्या भारी उसमे उतनी भागीदारी, जिस समाज का दल है उस समाज का बल है, सब समान तो देश महान हे ब्रिद वाक्य पुढे घेऊन जात एक अजेंडा तयार करण्यात आला.तो म्हणजे या राष्ट्रातील सर्व समुह गटाची,जातींची, पातीची जनगणना करणे हेच राष्ट्रीय समाज पक्षाचा अजेंडा आहे. या देश्यातील प्रत्येक जातीची डोके मोजली गेली तर आर्थिक बजेट करता येईल, असे विधान राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष काशीनाथ नाना शेवते यांनी केले.

चंद्रपूर जिल्हा दौऱ्यावर असतांना कार्यकर्ता आढावा बैठकीत ते बोलत होते.

राष्ट्रीय समाज पक्षाचे चंद्रपूर जिल्हा आढावा बैठक स्थानिक वनविश्राम गृहात आयोजित करण्यात आली होती. या आढावा बैठकीला प्रदेशाध्यक्ष काशीनाथ नाना शेवते, महाराष्ट्र मुख्य महासचिव ज्ञानेश्वर माऊली सलगर, विदर्भ प्रदेश अध्यक्ष ॲड प्रा रमेश पिसे, विदर्भ संपर्क प्रमुख राजेंद्र पाटील, विदर्भ मुख्य महासचिव संजय कन्नावार , बल्लारपूर तालुका अध्यक्ष साईनाथ येवले,कुमार जुनमलवार आदी उपस्थित होते.
या आढावा बैठकीत अनेकांनी पक्षप्रवेश घेतला.


पुढे बोलताना म्हणाले की,ज्या समाजाची जितकी टक्केवारी आहे त्यानुसार सामाजीक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक भागीदारी मिळाली पाहिजे ही राष्ट्रीय समाज पक्षाची भूमिका आहे.शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळाला पाहिजे, सर्वसामान्यांना पहीली ते उच्च शिक्षणापर्यंत मोफत शिक्षण मिळाला पाहिजे ही पक्षाची भूमिका असल्याचे मत  प्रदेशाध्यक्ष यांनी यावेळी व्यक्त केला. 


यावेळी चंद्रपूर महिला आघाडी जिल्हाध्यक्षा पदावर सौ.वंदना गेडाम यांची तर महीला आघाडी जिल्हा सचिव वनश्री फुलझेले, उपाध्यक्षा अनु मगीडवार, बल्लारपूर विधानसभा प्रमुख पदावर सय्यद रज्जाक, चंद्रपूर शहर अध्यक्ष पदावर राजेंद्र उमाटे आदींची  निवड करण्यात आली. या बैठकीला चंद्रपूर जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते..