उपेक्षित राष्ट्रीय समाजाला अपेक्षित ठिकाणी घेऊन जाणारे नेतृत्व म्हणजे "राष्ट्रनायक महादेव जानकर " "Rashtra Nayak Mahadev Jankar" is the leader who will take the marginalized national society to desired place.



यशवंत सेनेचे सरसेनापती, राष्ट्रीय समाज पक्षाचे National Social Party संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष, आमदार ते महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री असा रानोमाळ ते विधानभवन प्रवास करणारे राष्ट्रीय समाजाचा आवाज बनून काम करणारे आ.महादेव जानकर Mahadev Jankar साहेबांची महाराष्ट्रातच नाही तर देश पातळीवर त्यांच्या साधेपणाची चर्चा होत असते. पण तितकेच कष्ट व त्याग ही फार मोठा आहे.


महाराष्ट्राच्या Maharashtra मंत्री मंडळामध्ये पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय Animal Husbandry, Dairy Development and Fisheriesअश्या तीन-तीन खात्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून काम पाहिलेले आ.महादेव जानकर साहेबांनी मंत्री पदाच्या काळात शोषित, वंचित व उपेक्षित घटकांना न्याय देण्यासाठी अग्रेसर राहून काम केले. राष्ट्रीय समाजाचा आवाज बनून देशपातळीवर काम करत असताना खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या बाहेर गुजरात, कर्नाटक व उत्तर प्रदेशात पक्षाला प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता प्राप्त करून घेत गुजरात gujrat सारख्या राज्यात वडोदरा wadodhara, पदरा नगरपालिका, करजन नगरपालिकेमध्ये राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर सामोरे जात गल्ली पासून दिल्ली पर्यँत सत्ता केंद्र असणाऱ्या बलाढ्य शक्तीच्या विरोधात लढून नगरसेवक निवडून आणत दोन नंबरचा पक्ष बनून विरोधी पक्ष नेते पद सुद्धा रासपने ताब्यात घेतलं.


राष्ट्रीय पातळीवर पक्षाला वेगळ्या उंचीवर महादेव जानकर साहेबांनी आज नेहून ठेवलं आहे. मंत्री पद आल्यावर महाराष्ट्राने पाहिलं आहे साधा राज्यमंत्री देखील स्वतःचा एक नाही तर दोन-दोन बंगले उभा करतो. अहो, राज्यमंत्री सोडा गावाचा सरपंच झाला तरी बंगला, फार्म हाऊस असे वेगवेगळ्या नावाने बंगले बांधतो, पण महादेव जानकर साहेब राज्यभर फिरताना कार्यकर्त्यांच्या वाड्या-वस्तीवर मुक्काम करत त्याच्या कडीलच भाजी-भाकरी खाऊन पुढील प्रवासाला निघतात हा दिनक्रम गेले ३० वर्षांपेक्षा अधिक काळापासून अखंड सुरू आहे. मुंबईत आल्यावर आजही त्यांचा मुक्काम पक्षाच्या प्रदेश कार्यालयामध्येच असतो. त्यांना साधं स्वतःला घर देखील घेण्याचा विचार करता आला नाही. इतका सरळ मार्गी असणारा माणूस आजच्या काळात ही त्यांच्या रूपाने पाहायला मिळतो, समाजाने घामाने कमावलेले पैसे दिलेत आणि हा राजकीय पक्ष निर्माण झालाय याची जाण ठेऊन मिळेल त्या वाहनाने प्रवास करीत आपल्या ध्येया पर्यँत पोहचण्यासाठी आज ही तत्पर असतात.


 एकाद्या माणसाने किती ही ठरवलं ना मी साधं राहीन, तरी उसन अवसान आणण जमत नाही, पण हे जमावव ते महादेव जानकर साहेबांनीच खरेच ते नेहमी म्हणतात ना "असल से नकल, क्या मुकाबला कर सकती है, असली ते असली नकली ते नकली" खरेच आहे, कारण जाणीव ठेवून काम करणारा असा रक्ता, रक्तात राष्ट्रीय समाजाचा विचार नेहमीच करणारा माणूस असावा लागतो, त्याची नाळ ही जनमाणसाशी जोडलेली आहे, ती कोण ती ही शक्ति तोडू शकत नाही.


नेहमी प्रमाणे आज ही त्याचा प्रत्यय आला, रात्री कर्नाटक राज्यातील आराध्य दैवत चिंचणी माय्याक्का देवीचे दर्शन घेऊन रात्रभर प्रवास करत पहाटे पाच वाजता मुंबईत रासप प्रदेश कार्यालयात आले. पुन्हा सकाळी नऊ वाजता आवरून तयार झाले होते. दिवसभर गाडीने मुंबईतील गाठीभेटी दौरा करून आम्ही सायंकाळी पाचच्या दरम्यान रासपच्या प्रदेश कार्यालयात आलो. बाहेरील खुर्च्यांवर आम्ही गप्पा मारत बसलोय तर अवघ्या पाच मिनिटांत पुन्हा एकदा पिशवीत घोगडी, लुंगी व आंघोळीचे कपडे टाकून जानकर साहेब पुढील प्रवासाला निघण्यासाठी चप्पल घालत घालत म्हणाले, रासपचे केंद्रीय महासचिव कुमार सुशील व केंद्रीय संघटक बाळकृष्ण लेंगरे मामा यांना पालघरला यायला सांगितलं आहे. त्यांना घेऊन मुक्कामाला पालघर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांकडे जातो. उद्या काही भेटीगाठी घ्यायच्या आहेत. तुम्हाला यायचं असेल तर चला म्हणत लोकल रेल्वे पकडण्यासाठी हातात ती पिशवी घेत मरीन ड्राइव्हचे रासप प्रदेश कार्यालय ते चर्चगेट रेल्वे स्टेशनला चालत निघाले. त्यांच्या हातातील पिशवी घेत त्यांना पुढील प्रवासाला सोडण्यासाठी गप्पा मारत चर्चगेट स्टेशन ला पोहोचलो. स्टेशन वर स्वतः तिकीट रांगेत उभा राहून काढले. रेल्वे यायला पाच मिनिटांचा अवघी होता, रेल्वेसाठी प्लॅटफॉर्म वर थांबलो असताना जानकर साहेबाना पाहून बरेच जण येऊन बोलू लागले, आपुलकीने त्यांनी प्रत्येकाची नावे, गांव चौकशी केली. तितक्यात रेल्वे आली प्रथम श्रेणीचे तिकीट काढले होते पण तिथे खूप गर्दी झाली होती आम्ही जाऊ पर्यँत सर्वजण बसले होते. कोणाला नको उठवू म्हणत, माझ्या हातातील ती पिशवी घेऊन उभा राहिले. एकटेच पुढील प्रवासाला निघाले, असा माणूस होणं पुन्हा कधीच शक्य नाही.



आज असे समाजकारणातून 'राज'कारण करणारे खुप राजकारणी पाहिले पण महादेव जानकर साहेब यांच्या सारखे नेक राजकारणी पुनः होणे नाही किंबहुना त्यांची जडणघडण रानोमाळ ते विधानभवन अशी झाली आहे. आता पुढील राजकीय लढाई ही प्रस्थापित्यांच्या मतदारसंघात मुसंडी मारून ती जागा जिकून आणुन जाईन्ट किलर होणेसाठी ते रात्रंदिवस आपल्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून गाव तिथं शाखा, एक बूथ टेन युथ ही संकल्पना राबवून पक्ष, गाव, तालुका, जिल्हा, राज्य, देश पातळीवर पोहचण्यासाठी देशभर जनसंपर्क अभिमान अंतर्गत हर हर महादेव! घर घर महादेव!! राष्ट्रीय समाज पक्ष देशभर हे मिशन घेऊन मार्गक्रमण करत मजल दरमजल करत चालत आहेत. 


आज ह्या राज्यात तर उद्या त्या राज्यात असे देशभर राष्ट्रीय पातळीवर आपल्या पक्षाची प्रतिमा "राष्ट्र ही देव, राष्ट्र ही जाती, राष्ट्र ही धर्म हमारा, राष्ट्र बने बलशाली, यह भाषा सूत्र हमारा"! हे मुख्य उद्देश डोळ्यासमोर पक्षाचा आलेख देशभर वाढवून प्रत्येक राज्यात दोन, दोन खासदार निवडून आणून किंवा जास्तीत जास्त राज्यात पक्षाचे "वोट ऑफ परसेंटेज" कसे वाढवता येईल आणि पक्ष राष्ट्रीय कसा करता येईल. त्यासाठी जानकर साहेब रात्रंदिवस कष्ट करत आहेत, त्याप्रमाणे राष्ट्रीय अजेंडा सेट करून महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, कर्नाटक, राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तराखंड, बिहार, दिल्ली, हिमाचल प्रदेश, आसाम, तामिळनाडू, झारखंड या राज्यात अधिकृत पक्षाचे काम जोमाने वाढत आहे. त्यातून आगामी काळात राष्ट्रीय समाज पक्ष दिल्लीच्या म्हणजेच संसद भवनच्या सभागृहात जास्तीत जास्त खासदार निवडून आणून पक्षाचे राष्ट्रीय करणे हेच प्रथम लक्ष निर्धारित केले आहे. 

त्याप्रमाणे सर्व राष्ट्रीय संघटन व राष्ट्रीय कार्यकारिणी यांनी कार्यकर्त्यांच्यासाठी एक मार्गदर्शिका जारी करून त्यांना आगामी लोकसभेसाठी कार्यक्रम देऊन पक्ष मजबूत करायचा किंबहुना राष्ट्रीय समाज पक्ष दखलपात्र झालाच पाहिजे, ही प्रामाणिक भूमिका अदा करून आगेकूच करत आहेत. त्यासाठी महादेव जानकर साहेब यांनी राजकारण हे बेरजेचेच करून सब समान तो देश महान ! या उक्तीप्रमाणे संघटन मजबूत करून पक्ष मजबूत करणे. हेच एकमेव ध्येय घेऊन राष्ट्रानाय महादेव जानकर साहेबांची वाटचाल सुरू आहे.
नक्कीच एक दिवस भारताचे प्रधानमंत्री म्हणून महादेव जानकर साहेब शपथ घेतील.

शब्दांकन : अजित पाटील
युवक अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र
राष्ट्रीय समाज पक्ष