बनावटी देशी दारू अड्यावर धाड Raid on counterfeit country liquor




Chandrapur चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातील चितेगांव येथील ए व्हि जी गोट फार्म येथील बनावट अवैध देशी दारूच्या अडयावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने State Excise Department  धाड टाकून सुमारे 17 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर कारवाईमुळे मूल तालुक्यातील अवैध दारूविक्रेत्यामध्ये खळबळ माजली आहे.

 चंद्रपूर जिल्हयात दारूबंदी असताना मोठया प्रमाणावर अवैध दारूविक्री सुरू होती, महाविकास आघाडी सरकाने चंद्रपूर जिल्हयातील दारूबंदी उठविली, मात्र अवैध आणि बनावट दारूविक्री आजही मोठया प्रमाणावर सुरू आहे, मूल तालुक्यातील राज्य महामार्गावर असलेल्या चितेगांव येथील ए व्ही जी गोट फार्म  मध्ये अवैध बनावटी दारू बनविण्याचे काम सुरू होते, सदर माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला माहिती होताच आज बुधवारी सकाळी धाड टाकुन सुमारे 17 लाखा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याठिकाणाहुन रॉकेट देशी दारू प्रवरा डिस्टिलरी अहमनगर Rocket Desi Daru Pravara Distillery Ahamnagarच्या नावाने असलेले कागदी खोके आढळुन आले आहे.

ए व्ही जी गोट फार्म संचालक फरार

 ए व्ही जी गोट फार्म चे संचालक अरुणा मरस्कोले सध्या फरार आहेत,यात काम करीत असलेले पवन वर्मा उर्फ गोले आणि शाम मडावी व इतर सर्व आरोपी फरार आहेत, 
सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाचे श्री वाघ, संदीप राउत, विकास थोरात, जगदीश पवार, अमित सिरसागर, अभिजीत लिचडे, मोनाली कुरूडकर यांनी केले.