सिटीपीएसच्या डांबरावर सिमेंटची लिफापोती Cement envelope over CityPS asphalt




चंद्रपूर :- २०२२ मध्ये उर्जानगर urjanagar परीसरात प्रमुख रोडचे डांबरीकरण कामे करण्यात आली.या रोडची कामे इतक्या निकृष्ट दर्जाचे करण्यात आले आहे कि अवघ्या महीणाभरात रोडवरील डांबर उखडल्या गेले, त्यामुळे रोडवर मोठ मोठे खड्डे पडले आहे.ते खड्डे बुजण्यासाठी कंत्राटदारांनी अकलेचे तारेच तोडले आहे.खड्डे बुजविण्यासाठी कंत्राटदारांनी सिमेंट रेती गिट्टीचा वापर करून त्या खड्डा वर लिपापोती केली,खरे तर त्या डांबरीकरणावरील खटड्ड्यामध्ये डांबर टाकणे आवश्यक होते.मुदतीच्या पुर्वीच नुतनीकरण केलेल्या रोडवर मोठमोठे खड्डे पडल्याने कंत्राटदारांच्या कामाची गुणवत्ता विभागाला लक्षात आली आहे.त्यामुळे विभागाने डागडुजी करण्यासाठी कंत्राटदाराला सांगितले,मात्र कंत्राटदारांनी वेळ पैसा वाचविण्यासाठी हा केवीलवाणा प्रयत्न केला असल्याची तक्रार शिवसेना कंत्राटी कर्मचारी कामगार सेनेच्या कैलास तेलतुंबडे यांनी केले आहे.

सदर कामाबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता यांना विचारले असता, त्यांनी पुर्णतः चुकीच्या पद्धतीने काम केल्या गेले असून डांबर हे थंड आहे आणि सिमेंट हे गरम आहे त्याचे मिश्रण होऊ शकत नाही.त्यामुळे खड्ड्यामध्ये टाकलेला सिमेंट जास्त काळ तग धरून राहणार नाही.खड्ड्यात टाकलेला सिमेंट ही उखडून जाईल,डाबरीकरणावर खड्डे भरण्यासाठी डांबराचाच वापर केला जातो मात्र कंत्राटदारांनी संबंधीत विभागाच्या डोळ्यात धुळ फेकण्याचा प्रयत्न केला असून ते खड्डे पुन्हा पडणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

उर्जानगर परीसरात झालेल्या या रोडच्या नुतणीकरणाची सखोल चौकशी करावी, कंत्राटदारांच्या या कामाची गुणवत्ता तपासणी करावी,सदर कंत्राटदारांच्या कामाची सखोल चौकशी करून कारवाई करावी व दोषी कंत्राटदारांचे नाव काळ्या यादीत टाकण्यात यावे व केलेल्या कार्यवाही चा अहवाल आम्हाला अवगत करावे,सदर कामाची चौकशी करून दोषी कंत्राटदारांवर कार्यवाही न केल्यास शिवसेना कंत्राटी कर्मचारी कामगार सेनेच्या पध्दतीने आंदोलन करण्यात येईल आणि याला सर्वस्वी जबाबदार आपला विभाग राहील