▪️ Editor - Sanjay Kannawar ▪️ Mobile - 9158399455

त्या नरभक्षक वाघाच्या हल्ल्यात महीलेचा बळी




सावली तालुका प्रतिनिधी:- शेतातील कापूस वेचण्यासाठी गेलेल्या महीलेचा दबा धरून बसलेल्या वाघानेtiger हल्ला केल्याने महीलेचा जागीच मृत्यू झाला.स्वरूपा प्रशांत एलट्टीवार वय ४२ रा.खेड्डी ता.सावली असे मृत महीलेचे नाव आहे.सावली तालुक्यात या नरभक्षक वाघाने आतापर्यंत ३ जणांचा बळी घेतला आहे.उसेगाव,रुद्रापूर आणि आता खेडी येथील बळी ठरले. त्या नरभक्षक वाघाच्या बंदोबस्त करण्यात यावा अशी होत असतांना सुध्दा वनविभाग मात्र कुभंकर्णाच्या झोपेत आहे.या नरभक्षक वाघाच्या भितीमुळे शेतकऱ्यांनी शेतात जाणे बंद केले आहे.एकीकडे वरुणराजाची वक्रदृष्टी आणि दुसरीकडे वन्यप्राण्यांच्या हल्ला यात शेतकरी वैतागला आहे.

नरभक्षक वाघांना त्‍वरीत जेरबंद करावे अन्‍यथा निलंबनाची कारवाई – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार sudhir mungantiwar 
चंद्रपूर जिल्‍हयात वाघांच्‍या हल्‍ल्‍यात सातत्‍याने जाणारे बळी ही अतिशय चिंतेची बाब असून या नरभक्षक वाघांना त्‍वरीत जेरबंद करावे अन्‍यथा निलंबनाच्‍या कारवाईला सामोरे जावे लागेल असा ईशारा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिला आहे.
दिनांक १४ डिसेंबर रोजी मुल तालुक्‍यातील कांतापेठ येथे देवराव सोपनकार, सावली तालुक्‍यात बाबुराव कांबळे व १५ डिसेंबर रोजी खेडी येथे स्‍वरूपा येलट्टीवार यांचा वाघाच्‍या हल्‍ल्‍यात मृत्‍यु झाला. त्‍याआधी ७ डिसेंबर रोजी पेटगांव येथे देखील वाघाच्‍या हल्‍ल्‍यात एकाचा मृत्‍यु झाला. सतत होणारे वाघांचे हल्‍ले व नागरिकांचे जाणारे बळी ही चिंतेची बाब आहे. या वाघांना तातडीने जेरबंद करण्‍याची आवश्‍यकता आहे. याबाबत कोणतीही हयगय खपवून घेणार नाही, असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्‍हटले आहे. याबाबत त्‍यांनी वनविभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी व सर्व संबंधित अधिका-यांना तातडीच्‍या कार्यवाहीचे निर्देश दिले आहे.