▪️ Editor - Sanjay Kannawar ▪️ Mobile - 9158399455

प्रदुषण नियंत्रण मंडळ कार्यालयात लिक्विड नसलेले अग्निशमन बंब




जिल्ह्यातील प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेल्या महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ जिल्हा कार्यालयात आपतकालीन आग विझवण्यासाठी यंत्रणा लावण्यात आली आहे. मात्र विझविण्यासाठी लिक्वीड नसलेले अग्निशमन बंब लावण्यात आले आहे. त्यामुळे शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन येथे होत नसल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे..

महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ हे प्रदुषणावर आळा घालण्यासाठी कार्य करीत असते. चंद्रपूर जिल्ह्यातील प्रदुषण नियंत्रण मंडळ हे उद्योग भवनातील तिनमजली इमारतीच्या सुसज्ज इमारतीत आहे. जिल्हयात अनेक उद्योगातील प्रदुषणामुळे जनता त्रस्त आहे. स्थानिक जनता अनेकदा महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या प्रदुषणा विषयक गाऱ्हाणे लोकप्रतिनिधीकडे मांडते. मात्र, प्रदूषणाच्या प्रश्नाकडे कानाडोळा केला जात आहे.



या भवनात जवळपास १० कार्यालये आहेत. या कार्यालयांमध्ये येणाऱ्या जाणाऱ्याची संख्या जास्त आहे. या परीसरात पाण्यासाठी बोअरवेल खोदण्यात आले आहे. मात्र, पाण्याचा पुरेसा पुरवठा होत नसल्याने शौचालय बाथरूम बंद करण्यात आले आहे. पाण्याचा वापर करण्यासाठी खाली टाकीत पाणी जमा करून वरच्या मजल्यावर असलेल्या पाण्याच्या टाकीत जमा केला जातो. आणि त्याच पाण्याचा वापर केला जातो. अचानक या परीसरात आग लागल्यास आग विझविण्यासाठी पाणी आणणार कुठून हा गंभीर प्रश्न आहे!


अचानक आग लागल्यास आग विजणविणारी यंत्रणा आहे. पण ते फक्त ऑडिट करण्यापुरते आहे, ही वस्तूस्थिती आहे. या कार्यालयात असे अनुचित प्रकार घडल्यास जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.