नोकरीचे आमिष देऊन युवकाची फसवणूक करणाऱ्या आरोपीला शहर पोलिसांनी केली अटक



चंद्रपुर :- वेकोलीत नोकरीचे आमिष दाखवून युवकाची 5 लाखांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला शहर पोलिसांनी अटक केली आहे. युगकुमार पंचबुद्धे असे अटकेतील आरोपीचे नाव असून शहर पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

आरोपी युगकुमार पंचबुद्धे हा बेरोजगार युवकांना वेकोली व वनविभागात नोकरी लावून देतो असे आमिष द्यायचा. दरम्यान आरोपी युगकुमार पंचबुद्धे याच्यावर नागपूर जिल्ह्यात सुद्धा फसवणुकीचे 2 गुन्हे दाखल असून चंद्रपुरातील रामनगर पोलीस ठाण्यात सुद्धा ४२० चे गुन्हे दाखल असून चेक बाऊन्स चे त्याच्यावर गुन्हे अनेक दाखल आहेत.

युगकुमार पंचबुद्धे नागपूरातील बुट्टीबोरी जवळ नॅशनल मिशन बांबू या नावाने संस्था चालवतो यातून विविध एजंटच्या माध्यमातून बेरोजगार युवकांना नौकरीचे आमिष देऊन फसवणूक करायचा.

चंद्रपुरातील शुभम ठाकरे हा बेरोजगार युवक आरोपी युगकुमार पंचबुद्धे याच्या संपर्कात आला. दरम्यान त्या युवकाला आरोपीने वेकोलीत नोकरी लावून देण्याचे अमिश दाखवले व पाच लाखांची मागणी केली. त्या युवकाने पैसेही दिले. त्यानंतर आरोपीने त्या युवकाला वेकोली उमरेड चे व्हिटीसी चे पत्र दिले त्यानंतर उमरेड ला मेडिकल सुद्धा करण्यात आले. सदर सर्व प्रकार 22 मार्च ते 17 मे 2022 या कार्यकाळात घडला, दरम्यान तो युवक वेकोली कार्यालयात कागदपत्रे घेऊन गेला असता अधिकाऱ्यांनी त्याला हे कागदपत्रे खोटे असल्याचे सांगितले.

दरम्यान शुभम ठाकरे या युवकाला आपली फसवणूक झाल्याचे लक्ष्यात येताच शहर पोलीस ठाण्यात आरोपी युगकुमार पंचबुद्धे याच्या विरोधात तक्रार दाखल केली.
त्यानंतर शहर पोलिसांनी आरोपी युगकुमार पंचबुद्धे याला अटक केली असून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

सदर कारवाई शहर पोलीस निरीक्षक सुधाकर अंबोरे यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथकाचे सपोनि जयकुमार निर्मल व त्यांचे पथक करीत आहेत.