▪️ Editor - Sanjay Kannawar ▪️ Mobile - 9158399455

तीन वर्षे सेवा पूर्ण झालेल्या शिक्षणसेवकांना नियमित प्राथमिक शिक्षकांचे आदेश देण्यात यावे       चंद्रपूर :-  पवित्र पोर्टलद्वारे १२/०९/२०१९ ला आठ शिक्षणसेवकांची समुपदेशनाने पदस्थापना करण्यात आली . शिक्षणसेवक म्हणून त्यांच्या सेवेला ११/०९/२०२२ ला तीन वर्षे पूर्ण झाली . करीता त्यांना नियमित प्राथमिक शिक्षकाचे आदेश निर्गमित करून वेतनश्रेणी लागू करणे आवश्यक आहे .परंतु प्रशासनाकडून याबाबत विलंब केल्या जात आहे .
                याबाबतीत पुरोगामी शिक्षक संघटनेने ११/०८/२०२२ ला चंद्रपूर जिल्हा परिषद कार्यालयास पत्र देऊन अवगत करण्यात आले . परंतु प्रशासनाने याविषयी गंभीर नसल्याचे दाखवत अजूनही कोणतीही कार्यवाही न करता जाणूनबुजून दिरंगाई करीत असल्याचा आरोप पुरोगामी शिक्षक संघटनेने केलेला आहे .
            जिल्हा प्रशासनाने संबंधित शिक्षणसेवकांना नियमित प्राथमिक शिक्षकाचे आदेश निर्गमित करीत वेतनश्रेणी देऊन न्याय प्रदान करण्याची मागणी एका निवेदनातून  पुरोगामी समितीचे राज्यनेते  विजय भोगेकर, राज्य सरचिटणीस हरीश ससनकर, राज्याध्यक्ष महिला मंच अल्का ठाकरे, राज्यसचिव निखिल तांबोळी ,जिल्हा प्रमुख सल्लागार दिपक व-हेकर, जिल्हा नेता नारायण कांबळे,जिल्हाध्यक्ष किशोर आनंदवार,जिल्हा सरचिटणीस संजय चिडे, जिल्हा कार्याध्यक्ष गंगाधर बोढे, जिल्हा कोषाध्यक्ष सुनिल कोहपरे, कार्यालयीन सचिव सुरेश गिलोरकर जिल्हा उपाध्यक्ष मोरेश्वर बोंडे,रवि सोयाम,सुधाकर कन्नाके,लोमेश येलमुले,विलास मोरे , जिल्हा नेता महिला मंच सुनिता इटनकर,महिला मंच अध्यक्ष विद्या खटी,  सरचिटणीस पौर्णिमा मेहरकुरे,कार्याध्यक्ष सिंधु गोवर्धन, कोषाध्यक्ष लता मडावी,  उपाध्यक्ष पुनम सोरते, सुलक्षणा क्षिरसागर, ,सहसचिव दुष्यंत मत्ते,प्रमुख संघटक नरेश बोरीकर, प्रमुख संघटक ज्ञानदेवी वानखेडे यांनी केली आहे .