गुंड प्रवृत्तीचे म्हणणे कोणत्या आधारावर..प्रतीमा ठाकूर





चंद्रपूर :- नुकताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे हे चंद्रपूरला येऊन गेले.त्याच्याच समोर पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांविरोधात घोषणाबाजी करत काही महीला पुरुषांनी ठिय्या आंदोलन केले.यावेळी स्वतः राज ठाकरे यांनी या आंदोलन कर्तांची बाजू ऐकून घेत प्रकरण १५ दिवसांत निपटारा करण्याचे आदेश पदाधिकाऱ्यांना दिले.मात्र आंदोलन कर्त्यांनी गुंड प्रवृत्तीच्या लोकांना पक्षातुन बाहेर काढण्याच्या घोषणाबाजी केली.त्यामुळे संतप्त झालेल्या महीला पदाधिकारी प्रतीमा ठाकूर व मनसैनिक भरत गुप्ता यांनी घोषणाबाजी करणारे व त्यांना पाठिंबा देणार्यांना पक्षातून काढून टाकावे व त्यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी पत्रकार परिषदेत केली.
विदर्भात तब्बल 100 कोटीं रुपयांचा घोटाळा करणाऱ्या कलकाम कंपनीचा वाद आता चांगलाच विकोपाला गेला आहे . मनसेच्या प्रतिमा ठाकूर व भरत गुप्ता हे कलकाम कंपनीची बाजू घेत एजंट व गुंतवणूकदार यांना धमकवीत होते असा आरोप केला. सदर प्रकरण नुकताच दौऱ्यावर आलेल्या मनसेच्या रिटा गुप्ता व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पर्यंत पोहचला. कम्पणीच्या एजंट व गुंतवणूकदार रत्नमाला चहारे यांनी पत्रकार परिषदेत ठाकूर व गुप्ता हे गुंड प्रवृत्तीचे आहे असे संबोधिले होते. कलकाम एजंट चहारे व लोणारे यांनी कोणत्या आधारावर आम्हाला गुंड म्हणून संबोधिले? असा सवाल मनसे महिला शहर अध्यक्ष प्रतिमा ठाकूर यांनी उपस्थित करीत चहारे व लोणारे यांच्यावर कारवाईचा इशारा दिला. Kal kaam news आज झालेल्या पत्रकार परिषदेत प्रतिमा ठाकूर यांनी वरोरा विधानसभा जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांचेवर आरोप करीत राज ठाकरे समोर जो कलकाम एजंट व गुंतवणूकदार यांनी गदारोळ केला त्याच्या पडद्यामागील सूत्र कुकडे यांनी हलविले होते, याबाबत आम्ही वरिष्ठांपर्यंत तक्रार केली आहे असे ठाकूर यांनी सांगितले.