पहील्यांदाच सभागृहात बहुजन समाजाचे प्रश्न उचलून धरल्याने आ.महादेव जानकरांचे कौतुक



राज्यात सत्तांतर झाल्यानंतरच्या पहिल्याच पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांना जशास तसं उत्तर देण्याचे आदेश दिल्याने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष होताना दिसत आहे. पण दुसरीकडे राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आ. महदेव जानकर यांनी विधान परिषदेत सर्व जातीनिहाय जनगणना करण्यात यावी अशी मागणी  केल्याने बहुजन समाजातून कौतुक होताना दिसत आहे. जे प्रश्न आजपर्यंत कोणीही उपस्थित केले नाहीत ते प्रश्न पहिल्यांदाच जानकर यांनी विधान भवनात मांडले आहेत.


शासकीय व निमशासकीय कार्यालये मध्ये व इतर मोठ्या काही कंपन्यांनी हंगामी स्वरुपात नेमण्यात आले आहेत. उर्जा विभागातील महापारेषण, महावितरण आणि महानिर्मिती या खात्यातील कंत्राटी कामगारांना वयाच्या 58 वर्षा पर्यंत कामाची हमी देण्यात यावी. हि मागणी आ. महादेव जानकर यांनी सभागृहात मांडल्याने सदया राज्यामध्ये लाखोंच्या संख्येने असलेल्या कंत्राटी कामगारांना प्रचंड आनंद झाला असून त्यांची हि मागणी  शासनाने मंजूर केली तर लाखो कुटुंबाला संरक्षण मिळणार आहे.
राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, मा.मंत्री महादेव जानकर साहेब यांनी आज अधिवेशनात १) मुळा धरणातील  नील क्रांती  योजनेतील पिंजरा पध्दतीने केलेल्या १४३ मत्स्यपालन व्यावसायिकांचे रखडलेले अनुदान तात्काळ देण्यात यावे. 
२) म्हसवड-पळसावडे-दिघंची-सांगली  हा दोन जिल्ह्यंना जोडणारा जिल्हा मार्ग निधीअभावी दुरूस्त करण्यासाठी अडचणी येत आहेत त्यामुळे सदर रस्ता  राज्य मार्ग घोषित करण्यात यावा. 
३)पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील टाटा पावर कंपनीच्या धरणावर पूल बांधण्यात यावा. 
४) शासकीय/निमशासकीय कर्मचार्यांना कोवीडने मृत्यू आल्यास ५० लाख रुपये आणि वारसांना नोकरी देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील सांगोला आगारातील कर्मचारी समीउल्ला मुलाणी यांचा कोविडने मृत्यू झाला आहे परंतु त्यांच्या कुटुंबाला कुठल्याही प्रकारची मदत मिळाली नाही, तरी तात्काळ मदत मिळावी अशी मागणी केली. 
५) तसेच सर्व जातीची जातिनिहाय जनगणना झाली पाहिजे अशी मागणी मा. जानकर साहेब यांनी सभागृहात केली. 
त्याबद्दल राष्ट्रनायक  मा महादेव जानकर साहेब यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.