आकाशातून लाल झोत खाली कोसळले



आज मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या दिवशी जिल्ह्यात आकाशातून नवीनच अवशेष पडल्याने नागरीकांमध्ये अनेक तर्कवितर्क लावले जात आहे.   चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात अनेक ठिकाणी उल्कापात दिसल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान अनेकांनी उल्कापात होताना आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात उल्कापात कैद केला असून सोशल मीडियावर सध्या हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.अनेक ठिकाणी ग्रामीण भागात ही तबकडी असल्याचे बोलल्या जातं आहे. पण नेमक काय आहे हे समजू शकले नाही.


मात्र चंद्रपूर पासून शंभर किलोमीटर अंतरावर असलेल्या सिंदेवाही तालुक्यात उल्कापिंड कोसळल्याचीही चर्चा आहे. या ठिकाणी मोठ्या आकाराच्या लोखंडी रिंग आकाशातून पडल्याची चर्चा आहे. खगोल अभ्यासकांनी हा पृथ्वीच्या कक्षेत आलेला उपग्रह असल्याची शंका वर्तवली आहे. चंद्रपूर व लगतच्या गडचिरोली जिल्ह्यातही अशाच प्रकारे आकाशातून लाल झोत खाली कोसळत असल्याचे चित्र दिसले आहे.