कवी लक्ष्मण खोब्रागडे यांच्या साहित्याचे लोकार्पण


चंद्रपूर ( प्रतिनिधी) -
जिल्हा परिषद चंद्रपूर ,रोटरी क्लब चंद्रपूर तथा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने मिशन गरुड झेप अंतर्गत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांच्या बक्षीस वितरण समारंभात झाडीबोली साहित्य मंडळ चंद्रपूर(ग्रा.)च्या शिक्षक साहित्यिकांच्या साहित्याचे प्रकाशन व लोकार्पण समारंभ मा.सां.कन्नमवार सभागृहात पार पडला.या समारंभात झाडीबोली साहित्यिक तथा जि.प. प्राथमिक शाळा भंजाळी येथील सहाय्यक शिक्षक लक्ष्मण खोब्रागडे यांच्या द्वारा निर्मित यश खेचून आणू दारी हा ललीतलेखसंग्रह, झाडी बोली काव्यसंग्रह मोरगाड आणि लिपन या काव्यसंग्रहाचे लोकार्पण मुख्य कार्यकारी अधिकारी मिताली सेठी यांच्या हस्ते करण्यात आले.सोबतच त्यांचा पुष्पगुच्छ सन्मानपत्र,आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.


या प्रकाशन सोहळ्यात झाडीबोली चंद्रपूर चे अध्यक्ष अरुण झगडकर यांचा भुभरी, संतोष मेश्राम यांचा ताटवा, सुनील पोटे यांचा आंबील, पंडित लोंढे यांचा वळण, प्रशांत भंडारे यांचा कवडसा,नागेंद्र नेवारे यांचा गुंफलेल्या वेली, जयंत लेंझे यांचा ऋतूरंग जीवनाचे आणि कवयित्री प्रिती जगझाप यांचा नंदादीप इत्यादी काव्यसंग्रहाचे लोकार्पण करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी मिताली सेठी यांनी केले तर अध्यक्षस्थानी डायट चे प्राचार्य धनंजय चापले होते तर प्रमुख अतिथी म्हणून दिपेंद्र लोखंडे शिक्षणाधिकारी प्राथमिक,श्रीमती कल्पना चौहाण शिक्षणाधिकारी (माध्यमिक )तसेच रोटरी क्लब चे अध्यक्ष श्रीकांत रेशीमवाला ,अविनाश उत्तरवार आदी मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्र संचालन कवी श्री विरेन खोब्रागडे आणि कल्पना बन्सोड यांनी केले.