प्राथमिक आरोग्य केंद्र लवकर सुरु करा अन्यथा आंदोलन छडण्याचा इशारा- शेतकरी संघटना



जिवती:- सध्याघडीला जिवती तालुका समस्याचे माहेरघर बनले आहे जिवती तालुक्यातील शेणगाव ग्रामपंचायत लोकसंख्येने मोठी आहे.आठवडी बाजार मोठा भरतो अजु बाजुच्या गावखेड्यातील जनतेला शेणगाव हा सोईस्कर ठरतो सध्या उणाळा सुरु असुन या उणाच्या उष्णते मुळे परिसरितील लोक बिमार होत आहे उपचार करण्यासाठी गडचांदूर किंवा चंद्रपूर जावावे लागत असल्यामुळे त्रास सहन करावे लागत आहे. शेणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे काम संपुर्ण झाले असुन कोणतेही काम शिल्लक राहिले नाही इमारत शोभेची वस्तु बनुन राहू नये म्हणून तात्काळ या इमारतीचे उध्दघाटन करुन आरोग्य सेवा त्वरीत परिसरातील जनतेला उपलब्ध करुन दयावे या मागणीचे निवेदन संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती जिवती यांना सय्यद शब्बीर जागीरदार तालुकाध्यक्ष, उध्दव गोतावळे तालुकाध्यक्ष दलित आघाडी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आले आठ दिवसात मागणी मान्य झाली नाहितर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या समोर अनोख्या पध्दतीने आंदोलन छेढण्यात येईल असा ईशारा निवेदनातून शेतकरी संघटना तालुका जिवतीच्या वतीने देण्यात आला