▪️ Editor - Sanjay Kannawar ▪️ Mobile - 9158399455

पक्ष वाढीसाठी संघटन महत्वाचे... महादेव जानकर



नागपूर : राष्ट्रीय समाज पक्षाला चार राज्यात मान्यता मिळाली असून पुन्हा दोन राज्यात मान्यता मिळवायची आहे.त्यासाठी कार्यकर्त्यांनी हेवेदावे विसरून पक्ष वाढीचे कार्य करावे,संघटन मजबूत करून पक्षवाढीसाठी कार्यकर्त्यांनी प्राथमिक सदस्यत्व स्विकारून निधी जमा करावी असे आवाहनही यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री आमदार महादेव जानकर यांनी  पदाधिकाऱ्यांचा आढावा बैठकीत केले.


राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने १० एप्रिल २०२२ रोजी, टिळक पत्रकार भवन धंतोली येथे  आढावा बैठकीचे आयोजन केले आहे होते.या आढावा बैठकीला राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक, अध्यक्ष मा.आमदार महादेवराव जानकर साहेब, नागपूरचे प्रा. रमेश पिसे,इंजिनियर सुषमाताई भड, अरुण गाडे, बलदेव आडे यांची उपस्थिती होती. या आढावा बैठकीसाठी विदर्भाचे संजय कन्नावार  संपर्क प्रमुख राजेंद्र पाटील, नागपूर प्रभारी दत्ता मेश्राम ,काटोलचे नफीस शेख व पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.