▪️ Editor - Sanjay Kannawar ▪️ Mobile - 9158399455 ▪️ RNI No. MAHMAR/2011/37424/

अवैध धंद्यावर आळा घालण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे निवेदनवणी - शहरातील अवैध धंदे बंद करण्याबाबत राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले त्यावेळी वणी पोलीस स्टेशनचे नवनियुक्त ठाणेदार राम कृष्ण महल्ले साहेब यांचा सत्कार करण्यात आला.शहरातील सार्वजनिक ठिकाणाच्या हाकेच्या अंतरावर मटके, जुगार, गुटका व गुटखाजन्यक पदार्थांची खुलेआम विक्री होत आहे. तसेच जागोजागी अवैध दारु ,जुगार मटक्याचे धंदे वाढले आहे. या अवैध धंद्यामुळे शहरात गुन्हेगारीचे प्रमाण सुद्धा वाढले असून शहरात कायदा व सुव्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. या अवैध धंद्यामुळे हजारो कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. तसेच या अवैध धंद्यामुळे ज्येष्ठ नागरिक, आबालवृद्ध, सुज्ञ नागरिकांसह महिला विद्यार्थी, विद्यार्थ्यांनींना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. वणी पोलीस ठाणे अंतर्गत येणारे हॉटेल्स,धाबे आणि रेस्टॉरंट अवैधरित्या दारू विक्रीचे केंद्र बनले आहेत. शहरात पानटपरीवर सहजपणे गुटखा उपलब्ध व तसेच सुगंधीत तंबाखूची खुलेआम विक्री होत आहे.वणी शहरातील सर्व अवैध धंदे पूर्णपणे बंद करावे अशा मागणीचे निवेदन यावेळी देण्यात आले.यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा प्रमुख अनिकेत चामाटे वणी विधानसभा प्रमुख नितीन गोरे,महिला शहराध्यक्ष प्रेरणा काळे,विद्यार्थी आघाडीच्या तालुका अध्यक्ष महेश बुच्चे,विद्यार्थी आघाडी शहराध्यक्ष योगेश तुराणकर,युवक तालुकाध्यक्ष नारायण गोवारदीपे,युवक शहराध्यक्ष संदिप ठोंबरे,तालुका उपाध्यक्ष अमित उराडे,युवक आघाडी तालुका उपाध्यक्ष आदित्य चामाटे,तालुका उपाध्यक्ष नयन आसपवार,युवक शहर उपाध्यक्ष संतोष कानारकर,युवक तालुका उपाध्यक्ष राजेश लोणारे,युवक शहर उपाध्यक्ष स्वप्नील राऊत उपस्थित होते.