▪️ Editor - Sanjay Kannawar ▪️ Mobile - 9158399455

उपेक्षीत घटकाला अपेक्षीत ठिकाणी नेण्यासाठी रासपची वाटचाल : प्रदेशाध्यक्ष काशीनाथ नाना शेवते




राष्ट्रीय समाज घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना झाली असून, राष्ट्रनायक मा. महादेव जानकर साहेबांच्या स्वप्नातील समाज निर्माण करण्यासाठी, उपेक्षित घटकाला अपेक्षित ठिकाणी नेण्यासाठी रासपची वाटचाल सुरू आहे. येणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक स्वबळावर लढणार असल्याचे मत राष्ट्रीय समाज पक्षाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष काशीनाथ शेवते यांनी केले आहे.



राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने चंद्रपूर येथील स्थानिक विश्राम गृहात आयोजित करण्यात आलेल्या सत्कार समारोह व आढावा बैठकीत बोलत होते.
सदर कार्यक्रमाला राष्ट्रीय समाज पक्षाचे मुख्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर, राष्ट्रीय संघटक गोविंद सुरनार उपस्थित होते. विदर्भ दौऱ्यावर असताना चंद्रपूर येथे जिल्हाध्यक्ष संजय कन्नावार यांच्या नेत्रुत्वात आढावा बैठक आयोजित करण्यात आला होता. यावेळी मान्यवरांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. मात्र, मान्यवरांचा सत्कार हार फुले शाल श्रीफळ न करता पुढील प्रवासासाठी त्यांना दोन हजार रुपये देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी पोलीस मित्र, पत्रकार तुळशीराम जांभुळकर यांनी आपल्या समर्थकांसह प्रवेश घेतला.


याप्रसंगी बोलतांना शेवते म्हणाले की, घराणेशाहीला मोडीत काढण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे त्यागी नेतृत्व महादेव जानकर साहेब यांनी स्थापन केलेल्या पक्षाची कास धरावी व या पक्षाचे वारस बनावे असे, मत यावेळी व्यक्त केले.

या कार्यक्रमास अनिकेत चामाटे, नितीन गोरे,मुन्ना मॅकलवार, संदीप कुळमेथे, अनूप यादव,साईनाथ येवले, निखील बुच्चे, योगेश तुराणकर, आदित्य चामाटे राजेश लोणारे, संदीप ठोंबरे आदींनी परिश्रम घेतले.