खाजगीकरणाचे षडयंत्र रद्द करण्यासाठी विज कामगारांचे कामबंद आंदोलन



चंद्रपूर :- केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी विज उद्योगाचे खाजगीकरण करून विज उद्योगाला कवळीमोल भावाने विकण्याचा केंद्र शासनाने राज्य शासनावर दबाव बनविला आहे. असे असले तरी आजपर्यंत खाजगीकण होउ न देण्याच्या बोंबा ठोकणारी राज्य सरकार गप्प का बसली आहे. अशा प्रकारचा सवाल कामगारांच्या मनामध्ये निर्माण झाला आहे.

हया आंदोलनामध्ये चंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशन, कोराडी, खापरखेडा, भुसावळ, परळी वैजनाथ व नाशिक विद्युत निर्मिती, पारेषण व वितरण विभागातील कामगार, कर्मचारी सहभागी होणार आहेत.

कामगार, कर्मचारी, अभियंता व कंत्राटी कामगारांच्या बि.एम.एस. भारतीय मजदूर संघ (BMW) सोडली तर जवळपास सर्वच महाराष्ट्रातील संघटना भाग घेणार आहेत,
हया आंदोलनामध्ये केंद्र सरकारणे लादलेले विजेचे खाजगीकरण रद्द करा व कंत्राटी कामगारांना ६० वर्षांपर्यंत कायम स्वरूपी नौकरीची हमी दया, हया एकमेव मागण्यांना घेऊन तिनही विज कंपनीचे कामगार कर्मचारी अभियंते व कंत्राटी कामगार २८ मार्च व २९ मार्च ला होणाऱ्या केंद्र सरकार व राज्य सरकारच्या कामगार कर्मचारी विरोधी धोरणाच्या निषेधार्थ काम बंद करून संपावर जाण्याचा निर्णय घेतलेला आहे.

एक महिना अगोदर विज उद्योगाला महाराष्ट्राचे उर्जामंत्री नितीनजी राउत यांना नोटीस देऊन कल्पणा दिली, परंतू आज पावेतो राज्य सरकार व उर्जा मंत्री व उर्जा विभागानी बैठकिला पाचारण संघर्ष समिती तसेच कंत्राटी कामगार कृती समीतीला केलेले नाही.

परंतू हया होऊ घातलेल्या काम बंद संपात महाराष्ट्र अंघारात गेल्यास हयाची जबाबदारी राज्य सरकारवर राहील. तेव्हा कामगार व महाराष्ट्रातील जनतेनी केंद्र सरकार व राज्य सरकारच्या हया कामगार जनता विरोधी नितीचा जय्यत विरोध करावा व हया आंदोलनाच्या पूर्व तयारी साठी दि. २५.०३.२०२२ ला सि.टी.पी.एस. मेजर गेट समोर सायंकाळी ५ वाजता कामगार कर्मचारी अभियंते व कंत्राटी कामगारांची संयुक्त जाहीर सभा होणार आहे. जास्तीत जास्त संख्येने वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन पत्रपरिषदेत कॉ. वामन बुटले, श्री. निताई घोष, शंकर बागेसर, श्री. प्रमोद कोलारकर, प्रफुल सागोरे, श्री. युवराज महींत, श्री. सुरेश भगत, श्री. सदानंद देवगडे, अरून नाकट, बंडू मडावी, शैलेश कोहळे व सोमेश्वर सोरते यांनी केले आहे.