महाज्योतीच्या माध्यमातून धनगर समाजातील बेरोजगार युवक-युवतींकरीता सैनिक व पोलीस भरती प्रशिक्षण योजना



चंद्रपूर,दि. 22 डिसेंबर : भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजातील युवकांमध्ये सैन्य व पोलिस भरतीसाठी प्रशिक्षणाचा अभाव असल्यामुळे बऱ्याच वेळेस सक्षम असतांना देखील संधी मिळत नाही. ही उणीव भरून काढण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था(महाज्योती) च्या माध्यमातून भटक्या जमाती -क प्रवर्गातील धनगर समाजातील युवक-युवतींना लष्करातील सैनिक भरती व राज्यातील पोलीस भरतीसाठी पूर्व प्रशिक्षण देण्यात येत आहे.

6 सप्टेंबर 2019 च्या शासन निर्णयान्वये, भरतीपूर्व प्रशिक्षणासाठी भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजातील युवक व युवतींना पदवी अभ्यासक्रमात किमान 60 टक्के गुणांसह असणे आवश्यक आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना लष्करातील सैनिक भरती व पोलीस भरतीसाठी पूर्व प्रशिक्षण देणे, तसेच स्पर्धा परीक्षेत भाग घेणाऱ्या युवक व युवतींना यशस्वीपणे सामोरे जाण्यासाठी आवश्यक ती पूर्वतयारी करून घेण्यासाठी व मूलभूत प्रशिक्षण देण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योतीच्या माध्यमातून ही योजना राबविण्यात येत आहे.

धनगर समाजातील इच्‍छूक व पात्र उमेदवारांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावा. काही अडचण भासल्यास 8956775376, 8956775677, 8956775678 व 8956775680 या दूरध्वनी क्रमांकावर अथवा महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था(महाज्योती), नागपूर येथील कार्यालयाशी संपर्क साधावा. असे आवाहन समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त, अमोल यावलीकर यांनी केले आहे.