▪️ Editor - Sanjay Kannawar ▪️ Mobile - 9158399455

वाघाच्या हल्ल्यात महीला वनरक्षक ठार



ताडोबा अंधारी व्याघ्र कोर क्षेत्रातील कोलारा वनपरिक्षेत्रात सध्या वन्यप्राणी गणना सुरु आहे. पानवठा क्रमांक 97 परिसरात ट्रांसेक्ट लाईन वर महिला वनरक्षक कर्तव्य बजावत असताना माया नावाच्या वाघीनीने प्राणघातक हल्ला करून ठार केल्याची घटना आज शनिवारी (20 नोव्हेंबर 2021) ला सकाळी आठ वाजता सुमारास कोलारा गेट जवळ घडली आहे. सौ. ढोमणे असे महिला वनरक्षकाचे नाव आहे. या घटनेने ताडोबा व्याघ्र अभयारण्यात एकच खळबळ उडाली आहे. या भागात वाघांचा जास्त वावर असून अनेक पर्यटक देश विदेशातून याच गेटवरून ताडोबात भ्रम करतात.
आज कर्तव्यावर असणाऱ्या सौ.ढोमणे या महिला वनरक्षकास वाघाने उचलून नेले असून त्या महिला कर्मचाऱ्यांचा शोध सुरु असल्याचे सांगितले जात आहे.