▪️ Editor - Sanjay Kannawar ▪️ Mobile - 9158399455

ब्रेकिंग न्यूज:- नवरगाव परीसरात विज कोसळल्याने २६शेळ्या मृत्युमुखी



सिंन्देवाही प्रतिनिधी, तालुक्यातील नवरगाव येथील कुरमार (धनगर)बांधव आपल्या शेळ्या शेतशिवारात चारत असतांनाच मेघिगर्जनेसह विज कोसळल्याने २६शेळ्या जागीच मृत्यू पावल्याने गरीबीचे जिवन जगणाऱ्या कुरमार बांधवाचे अतोनात नुकसान झाल्याने हळहळ व्यक्त केले जात आहे.त्यांना त्वरीत नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.
सविस्तर वृत्त असे की, नवरगाव येथे मेंढपाळ व्यवसाय करणारा समाज खुप मोठ्या प्रमाणात आहे.जगलपरीसरात जाण्यास वनविभागाची आडकाठी येत असल्याने मेंढपाळ बांधव उदरनिर्वाहाच्या विवंचनेत सापडलेला आहे.अश्यातच ज्यांच्याकडे ५,६शेळ्या होत्या त्यांच्या एकही शेळ्या शिल्लक राहिले नाही. आज मेघगर्जनेसह विज कोसळल्याने मेंढपाळ बांधवांवर आर्थिक कुऱ्हाड कोसळली आहे.आज नवरगाव जवळील आलेसूर गाव परीसरात १३० शेळ्याचा कळप चारत असतांनाच दुपारी १.३०ते २वाजेदरम्यान मेघगर्जनेसह विज कोसळली त्यातील २६शेळ्या मृत्युमुखी पडले.त्यात बिर्राजी जिगरवार ६,बुधाजी रेगडवार ५,बुधाजी कंकलवार ३,मल्ला बाकीरवार ५, ज्ञानेश्वर मर्लावार ३, मनोहर कड्रीवार ४ या मेंढपाळ बांधवांच्या शेळ्या मृत्युमुखी पडले.त्याच्यावय आर्थिक भुर्दंड बसल्याने त्यांना शासनाकडून त्वरीत नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी समाज बांधवांकडून करण्यात येत आहे.