मेंढपाळ बांधवांच्या समस्या घेऊन खासदार बाळू भाऊ धानोरकर यांना निवेदन



मुल तालुका प्रतिनिधी:-चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात मेंढपाळ बांधवांना खुप मोठ्या संकटांना सामोरे जावे लागत आहे.मेंढपाळ बांधव आपल्या शेळ्या मेंढ्या घेऊन जंगलोजंगली, मोकळ्या जागेत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत.मात्र मेंढपाळ बांधवांवर वनविभागाचे अधिकारी मेंढपाळ बांधवांकडून आर्थिक व्यवहार करून त्यांना हाकलून लावतात व शेळ्या मेंढ्या चराईसाठी बंधन करतात.त्यामुळे मेंढपाळ बांधवांना चराई पासेस देण्यात यावे जेणेकरून शेळ्या मेंढ्या चराई करता येईल, नुकताच भंगाराम तळोधी येथील ७ वर्षीय मेंढपाळ बालक मनोज तिरुपती देवेवार हा आपल्या आई वडीलासोबत मेंढ्या चारत असतांना वाघाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडला.त्या कुटुंबावर खूप मोठे संकट ओढवले आहे.त्याना त्वरीत नुकसान भरपाई देण्यात यावी.व त्या नरभक्षक वाघाला जेरबंद करण्यात यावे.मुल तालुक्यात शेळ्या मेंढ्यावर रोगाने थैमान घातले आहे.मात्र मुल तालुक्यात पशुवैद्यकीय अधिकारी नसल्यामुळे शेळ्या मेंढ्या उपचाराअभावी असेच मृत्यू पावत आहेत.त्यामुळे मेंढपाळावर उदरनिर्वाहाचा प्रश्न उद्भवत आहे.त्यामुळे मुल तालुक्यात पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची पदभरती करण्यात यावी.शेळ्या मेंढ्या वर आलेल्या रोगांवर कुठलेही औषधी, लसीकरण मोफत मिळत नसल्यामुळे मेंढपाळ बांधवांवर आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.त्यामुळे दोन्ही जिल्ह्यांत औषधी व लसीकरण मोफत देण्यात यावी,मेंढ्या व मेंढपाळ बांधवांना विमा कवच देण्यात यावा,व इतर मागण्यांबाबत सवीस्तर खासदार बाळु भाऊ(सुरेश) धानोरकर हे मुल येथे आले असतांना त्यांच्यासोबत चर्चा करून निवेदन देण्यात आले. यावेळी धनगर(कुरमार)समाजाचे संजय कन्नावार,अशोक कोरेवार,नितेश मॅकलवार,वासुदेव कंकलवार,गणेश रेगडवार ,दत्तू येग्गावार,सुधाकर रेगडवार,अशोक डेंकरवार व इतर समाजबांधव उपस्थित होते.