गडचांदूर च्या "जोगी" नगर च्या गैर प्रकाराची नगरविकास मंत्री नाम. तनपूरे यांचेकडे मागणार दाद !



चंद्रपूर : गडचांदूर शहरातील वसलेला जोगीनगर परिसरातील नागरिकांच्या तक्रारी गडचांदूर नगरपरिषद मध्ये दाखल झाले आहेत. आदिवासींच्या जमिनी गैर आदिवासींनी 100 रूपयांच्या स्टॅम्मपेपर विकून कृषक जमिनीला अकृषक न करता केलेला हा व्यवहार आता चव्हाट्यावर येत आहे. जोगीनगर वासी यांनी नुकतेच गडचांदूर चे सध्याचे उपाध्यक्ष शरद जोगी यांच्याविरोधात गडचांदूर च्या मुख्याधिकारी यांच्याकडे लिखित तक्रार केली आहे. सत्तेमध्ये असल्यामुळे आपल्यावर कोणतीच कारवाई होणार नाही या भ्रमात असलेल्याविरोधात राज्याचे नगर नगर विकास मंत्री नामदार प्राजक्त तनपुरे यांनी या प्रकरणाची निष्पक्ष वरिष्ठ चौकशी करून दोषींना दंडित करावे यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय कन्नावार सोमवार दिनांक 13 सप्टेंबर रोजी नगर विकास मंत्री यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन देणार असून गडचंदुर कोरपना या क्षेत्रामध्ये आदिवासींच्या जमिनी अल्प दामामध्ये खरेदी करून कृषक जमिनीला अकृषक न करता शासन नियमांच्या अवमान करणाऱ्या सगळ्यांची चौकशी करण्यात यावी यासंदर्भात निवेदन देण्यात येणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय कन्नावार यांनी दिली.
चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना गडचांदूर जिवती या परिसरात अशिक्षित आदिवासींच्या जमिनी अल्पदरात घेऊन त्याचे भूखंड पाडून कोट्यावधी रुपये कमविणाऱ्या ची संख्या शेकडोंच्या घरात आहे. आपल्या राजकीय पदाचा वापर करून स्वतःच्या पदरी करोडची माया जमा करणारे अनेक समाजकंटक आता समाजसेवकाच्या भूमिका निभावत आहे. या सगळ्याच स्वयंभू समाजसेवकांची चौकशी करण्यात यावी, त्यांच्या संपत्तीची चौकशी करण्यात यावी, आदिवासींच्या जमिनी विकणाऱ्या गैर आदिवासींची चौकशी करण्यात यावी या आशयाचे निवेदन सोमवार दिनांक 13 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. नुकतेच गडचांदूर मध्ये चर्चेत असलेले जोगी नगरची चौकशी करण्यात यावी अशी मागणीही या निवेदनात करण्यात येणार आहे.




सविस्तर वृत्त असे की, जोगी नगरच्या रहिवास्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आम्ही गडचांदूर चे रहिवासी असून पोट भरण्यासाठी मिळेल तो व्यवसाय करतो. आम्ही सर्व मूळ रहिवासी बाहेर गावचे असून आम्ही रोजगार च्या हेतूने गडचांदूर ला स्थायीक झालो व बैगवेगळ्या ठिकाणी किरायाने राहत अल्पशा मोलमजुरीत किरायाने राहुन आम्ही मजुरीचे व उसनवारी पैश्याची जमवाजमव करून प्लॉट खरेदी करण्याचा विचार केला. अश्यातच गैर अर्जदार शरद जोगी यांनी मागील व मेश्राम नगरला लागून जोगी नगर या नावाने शेत स.न. २६/१.१६/२,१६/३ या क्रमांकावर प्लॉट विक्रीस काढले असे कळले. तेव्हा आम्ही अर्जदार एक दुसऱ्याना ओळखत नसल्याने वेगवेगळ्या वेळेस आम्ही प्लॉट पाहणी केली. व प्लॉट चा दर विचारले असता प्लॉट परवडण्याजोगे वाटले व तेव्हा जोगी यांनी मी स्वतः नगरसेवक आहे आणि येथील रोड, नाली, विद्युतचे काम येत्या काही दिवसात करून देतो एवढेच नाही तर तुम्हच्या नावानी नगर परिषदेला नोंद घेऊन घरकुल ची योजना सुद्धा मिळवून देतो असे आश्वासन दिले.

गैर अर्जदार शरद जोगी हे नगरसेवक असल्याने आणि प्लॉट व्यवसायीक असल्याने आम्ही त्यांच्यावर गाढ विश्वास केला व आपल्या मोलमजुरीचे तसेच उसनवारी पैसे जमा करून त्यांना देऊन वेगवेगळ्या कीमतीत प्लॉट खरेदी केले. तेव्हा त्यांनी आम्हाला १०० रुपयाचा स्टॅम्प व रक्कम मला आणून द्या मी तुम्हची विक्री पत्र लिहून घरी पोहचवतो म्हणून सांगितले विश्वास बसल्याने आम्ही प्रत्येकांनी जोगी यांना आपआपली वेगवेगळी किंमतिची रक्कम व स्टॅम्प गैर अर्जदार जोगी यांना दिले व त्यानंतर त्यांनी आम्हाला आदिवासी श्री विनोद मडावी, लिलाबाई मडावी, कमलाबाई सोयाम यांच्या सहीचे स्टॅम्प आम्हाला आणून दिले. तेव्हा आम्हच्या लक्ष्यात आले की ज्यांनी आम्हाला स्वतःचे प्लॉट म्हणून विकले व विक्रीपत्र आदिवासी कडून करून दिले हे सर्व लक्ष्यात आले परन्तु आम्ही मोलमजुरी करणारे असून आम्ही आपल्या मजुरीची सर्व कमाई गैर अर्जदार यांना दिली असल्याने आम्हचा नाईलाज झाला. एखाद्याने म्हटले तर तुला कां अडचण आहे, बाकी कोणी काहीही बोलत नाही असे म्हणायचा त्यावेळेस आम्ही अर्जदार एक दुसऱ्यांना ओळखत नसल्याने हे खोटे बोलत असल्याचे लक्ष्यात आले नाही. काही दिवसांनी त्यांनी दिलेल्या जागेच्या ताब्या वर आपआपल्या झोपड्या बांधून राहायला लागलो परन्तु वर्ष लोटूनही तिथे काहीही सुविधा पोहचल्या नाही वा जागेची नोंद आम्हचे नावे नगर परिषदला झाली नाही तेव्हा काहींनी नगर परिषदला नोंदी करिता तगादा लावला तेव्हा प्रत्येकी पाच हजार खर्च येतील) म्हणून सांगितले. काहींनी


आपल्या नावाने फेरफार होतील या हेतूने अर्जदारा पैकी काहींनी ५०० ते ५००० रुपये दरम्यान रक्कम दिली तेव्हा काही दिवसात गैर अर्जदारांनी कमी रक्कमेची नगर परिषद चा शीक्का सही मारलेली टॅक्स) पावती आणून दिली. सदरची पावती मिळाल्याने त्या धारकांना समाधान वाटले व आता आपल्या नावानी जागा झाली असल्याचे समाधान वाटले. त्यानंतर कधीही टॅक्स भरण्यास गेले नाही परन्तु आठ दहा दिवसापूर्वी जेव्हा ती पावती घेऊन थकबाकी व चालू टॅक्स भरण्यास गेलो तेव्हा नगर परिषद च्या कर्मचाऱ्यांनी म्हटले की तुम्हच्या नावाची नोंदच नाही. ह्या पावत्या खोट्या आहे तेव्हा आम्ही त्याना गैर अर्जदार शरदजी जोगी उपाध्यक्ष यांनी दिल्या आहे. तर खोट्या कशा म्हणताच त्यांनी पुढे काही बोलले नाही. तेव्हा आम्हाला कळले की आम्हची यांनी फसगत केली. यानंतर ह्या खोट्या पावत्या दिल्या अशी चर्चा होताच बरेच लोकांकडून माहिती पडली की या गैरअर्जदारांनी बरेच लोकांची फसवणूक केली. आम्ही मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे असुन आम्ही आपल्या आयुष्यातील काबाळकस्ट करून प्लॉट घेतला परन्तु यांनी आम्हची फसवणूक केली आहे.

तरी कृपया आम्हाला सदर ठिकाणी सर्व सुविधा देतो म्हणून खोटे आश्वासन देणारे तसेच आम्हचे नावानी नगर परिषद ला नोंद करून देतो म्हणून जास्तीची रक्कम घेऊन कमी रक्कमेची खोटी टॅक्स पावती देणारे, व स्वतःचे प्लॉट म्हणून आदिवासी ची जागा विक्री करून आम्हची फसवणूक करणाऱ्या गैर अर्जदार शरद जोगी उपाध्यक्ष यांचे विरुद्ध योग्यती कार्यवाई करून आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी या मुख्याधिकाऱ्यांना केलेल्या निवेदनात जोगीनगर वासी यांनी केली आहे.
नगर विकास मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सदर प्रकरणाची सविस्तर चौकशी करून गरीब मोल मजुरी करणाऱ्यांची फसवणूक करणाऱ्याला व शासनाची दिशाभूल करणार्‍या शरद जोगी याच्यावर दंडात्मक व कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी आता गडचांदूर शहरामध्ये होऊ लागली आहे. शरद जोगी हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य असून सध्या परिस्थिती ते गडचांदूर नगरपंचायत चे उपाध्यक्ष आहेत. अल्पशा अवधीमध्ये त्यांनी कमवलेली संपत्ती ही गडचांदूर मध्ये चर्चेचा विषय आहे. त्यांच्या बेहिशोबी संपत्तीची या संबंधात हे राष्ट्रीय समाज पक्ष मागणी करणार असून उच्चविद्याविभूषित नाम. प्राजक्त तनपुरे यांनी वरील निवेदनाची त्वरित दखल घ्यावी असेच त्यांना या निमित्ताने सांगावेसे वाटते.