शोकांतिका;_आग लागली मात्र वरीष्ठ अधिकार्यांना माहीतच नाही




विशेष प्रतिनिधी
चंद्रपूर:-जगात पहील्या क्रमांकावर प्रदुषित शहर असलेल्या आणि जगात दुसऱ्या क्रमांकावर विज निर्मिती करणाऱ्या चंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशन मध्ये युनिट क्र.२मध्ये बंद असलेल्या युनिट मध्ये दि.२२सप्टेंबर२०२१ रोजी दुपारी ३वाजेदरम्यान अचानक काम करीत असलेल्या मजुराकरवी आग लागली.आग लागली हे सर्व माहीत असतानासुद्धा उप मुख्य अभियंते,व इतर कर्तव्य दक्ष अधिकारी यांना घटनेची माहिती असतानासुद्धा मला माहीतच नाही.मी तेव्हा बाहेर होतो.असे म्हणत सर्व जबाबदार अधिकाऱ्यांनी हात झटकले आहेत.युनिट क्र.१ व २ हे बदाव्यस्तेत आहे.त्या युनीट क्र१ला तोडण्याचे काम सनविजय कंपनीला देण्यात आले आहे.सनविजय कंपनी ही एका केंद्रीय मंत्र्याच्या सानीध्यात आहे.त्यामुळे सनविजय कंपनीचे संचालक बिनधास्त असून त्यांच्यासोबत कर्मचारी सुध्दा बिनधास्त आहेत.इतकेच नव्हे तर या युनीटचे इन्चार्ज (मुखीया) सुध्दा बिनधास्त आहेत.सनविजयच्या "अर्थपूर्ण" व्यवहारामुळे अधिकारी व कर्मचारी सनविजयच्या पायाला लोटांगण घालत असल्याचे मजुरांकडून बोलल्या जात आहे.ज्यांच्याकडे या युनिट चे चार्ज आहे त्यांच्या दुर्लक्षित पणामुळे व कर्तव्यावर उपस्थित नसल्यामुळे युनिट २ दोनमध्ये आग लागली.याला सर्व कारणीभूत युनिट इन्चार्ज वरीष्ठ अधिकारी असल्याचे सांगितले जात आहे.मात्र याकडे मुख्य अभियंता साहेब यांचे याकडे पुर्णतः दुर्लक्ष असल्याचे स्थानिक कामगारांमध्ये चर्चा सुरू आहे.याबाबत उपमुख्य अभियंता यांना घटनेसंदर्भात विचारले असता मला काहीच माहीत नाही मी चौकशी करून सांगतो,असे उत्तर अश्या कर्तव्य दक्ष अधिकाऱ्यांकडून मिळत असेल तर "नक्कीच दाल में कुछ काला है" हे कळलेलं आहे.
चंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशनमध्ये युनिट क्र १व२ हे संच काही वर्षांपासून बंदाव्यस्तेत आहे. यात कुठलेही विज उत्पादन होत नाही .मात्र त्याच त्याच युनिटचे कामे वर्षानुवर्षे एकाच कंत्राटदाराला देऊन मुख्य अभियंता व उपमुख्य अभियंता हे आपले कामे करीत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे " तेरी बि चुप मेरी बि चुप "असे करत अख्खे युनिट चे कामे त्याच त्याच कंत्राटदाराला देण्यात येते.दि.२२सप्टेबर रोजी दुपारी ३च्या सुमारास युनिट क्र २ मध्ये काम करीत असलेल्या मजुराकरवी युनिट मध्ये आग लागली .यावेळी वरीष्ठ किंवा युनिट इन्चार्ज हे आपल्या घरी ऐशोआरामात झोपून होते .या इन्चार्ज ची फक्त सकाळी १तास थांबणे व मग घरी निघून जाणे हा नित्य क्रम आहे.त्यामुळे युनिट क्र २मध्ये लागलेली आग ही या युनिट क्र २च्या इन्चार्ज ची असल्याचे मजूराकडुन बोलल्या जात आहे.या इन्चार्ज ने याच भरोश्यावर कोट्यवधी रुपये जमविल्याची चर्चा सध्या सिटीपिएस मध्ये ऐकावयास मिळत आहे