सिटीपीएस मधील युनिट इन्चार्जच्या निष्काळजीपणामुळे लागली आग, कामगारांमध्ये चर्चा !



विशेष प्रतिनिधी
चंद्रपूर:-जगात पहील्या क्रमांकावर प्रदुषित शहर असलेल्या आणि जगात दुसऱ्या क्रमांकावर विज निर्मिती करणाऱ्या चंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशन मध्ये युनिट क्र.२मध्ये बंद असलेल्या युनिट मध्ये कर्तव्य दक्ष युनीट इन्चार्ज (मुखीया) यांच्या दुर्लक्षित पणामुळे व कर्तव्यावर उपस्थित नसल्यामुळे युनिट २ दोनमध्ये दुर्लक्षित पणामुळे आग लागली.याला सर्व कारणीभूत युनिट इन्चार्ज असल्याचे सांगितले जात आहे.मात्र याकडे मुख्य अभियंता साहेब यांचे याकडे पुर्णतः दुर्लक्ष असल्याचे स्थानिक कामगारांमध्ये चर्चा सुरू आहे.
चंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशनमध्ये युनिट क्र १व२ हे संच काही वर्षांपासून बंदाव्यस्तेत आहे. यात कुठलेही विज उत्पादन होत नाही .हे यूनिट तोडण्यासाठी सनविजय या कंपनिला देण्यात आले आहे.संबधीत देखरेखीचे काम कार्यकारी अभियंता सुरेश उमरे यांना देण्यात आले आहे.त्यांच्या देखरेखीखाली काम चालू असतांनी त्यांच्या अनुपस्थितीत युनिट क्र २ क्र मध्ये आग लागली. त्यातच सनविजय कंपनीला युनिट क्र १चे काम मिळाले असतांनाच युनिट क्र २ मध्ये या कंपनीचे काम कसे सुरु आहे हे न समजणारे कोड आहे. वेगवेगळ्या युनिटचे कामे काढून " तेरी बि चुप मेरी बि चुप "असे करत अख्खे युनिट चे कामे त्याच कंत्राटदाराला देण्यात येते.इतकेच नव्हे तर सिव्हिल मधील एक उच्चभ्रू अधिकारी आपल्याच एका विशिष्ट जातीच्या लोकांना कंपनीचे सर्व कंत्राट त्यांचे नावे करीत असल्याची बोंब सध्या सिव्हिल मध्ये ऐकावयास मिळत आहे.दि.२२सप्टेबर रोजी दुपारी ३च्या सुमारास युनिट क्र २ मध्ये काम करीत असलेल्या मजुराकरवी युनिट मध्ये आग लागली .यावेळी वरीष्ठ किंवा युनिट इन्चार्ज हे आपल्या घरी ऐशोआरामात झोपून होते .या इन्चार्ज ची फक्त सकाळी १तास थांबणे व मग घरी निघून जाणे हा नित्य क्रम आहे.त्यामुळे युनिट क्र २मध्ये लागलेली आग ही या युनिट क्र २च्या इन्चार्ज ची असल्याचे मजूराकडुन बोलल्या जात आहे.


(थोड्याच वेळात सनसनीखेज भ्रष्टाचाराचे खुलासे प्रकाशीत होणार)