निष्क्रीय पालकमंत्री व प्रशासनाच्या नियोजनशुन्य कारभारामुळे जिल्ह्यात मृत्युमध्ये वाढ !



चंद्रपूर : नागपूरनंतर चंद्रपूर जिल्ह्यात रुग्णांचे मृत्यू अधिक आहे. ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेडचे अपुरे नियोजन याला कारणीभूत आहे. शासकीय न केल्यामुळे मृत्यूच्या प्रमाणात भरमसाट वाढ होत असल्याची टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार नरेश पुगलिया यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे पाठविलेल्या एका पत्रातून केली आहे.
जिल्ह्यात मेडिकल कॉलेज, शासकीय रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधांचा अभावही पहिल्या व दुसऱ्या लाटेतील मृत्यू संख्येला कारणीभूत
आहे. शासनाच्या निर्देशामुळे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने डॉक्टर व इतर स्टाफच्या नियुक्तीचे अधिकार असताना नियुक्तीस विलंब, कोरोनामध्ये काम करणाऱ्या स्टाफला वेतन देण्यास नकार. एकूणच अपुऱ्या स्टाफमुळे आ दररोज २० ते ३० रुग्ण मृत्युमृखी पडत पो असल्याने जनतेत भीतीचे वातावरण घट निर्माण झाल्याचेही पत्रात म्हटले आहे.
खनिज निधीत भरमसाट पैसा आहे. जिल्हा नियोजन फंडातून ३० टक्के खर्चाचे अधिकार असताना डॉक्टर व इतर मेडिकल स्टाफंची नियुक्ती वाढीव पगाराने न करण्यामागील कारणांच्या चौकशीची मागणीही नरेश पुगलिया यांनी केली आहे. प्रत्येक जिल्हा प्रशासनाने यासाठी नियोजन करण्याची ताकीद देण्यात आली आहे. याअनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन आरोग्य विभागाला निर्देश दिले; परंतु अंमलबजावणी कोण करणार, असा सवाल पुगलिया यांचा आहे.