काँग्रेस मधील ओबीसींचा कोहिनुर हिरा निखळला!- महादेव जानकर



मुंबई-:भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मधील ओबीसींचे युवा नेते राज्यसभेचे खासदार श्री.राजीव सातव यांचं आज दिनांक-16 मे 2021 रोजी दुःखद निधन झालं. राजीव सातव यांना राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने श्रद्धांजली अर्पित करतो, काँग्रेस मधील युवकांचा कोहिनुर हिरा निखळला आहे, असा शाेक महादेव जानकर यांनी व्यक्त केला आहे.
काेविडच्या महामारीमुळे ऐन तारुण्यातील खासदार,अत्यंत कमी वयात राजीव सातव यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेपासून ते हिंगोलीचे खासदार हाेण्यापर्यंतचा त्यांचा राजकीय प्रवास झाला आहे. सध्या ते राज्यसभेचे सदस्य हाेते. अखिल भारतीय युवक काॅंग्रेसमध्ये काम करत असताना त्यानी ओबीसींना या पक्षात जास्तीतजास्त काम करण्याची संधी कशी देता येईल यावर भर देत असत, प्रत्येक योग्य संधीचे त्यांनी साेने केले. स्वभाविकपणे देशातील युवकांचा तरुण नेता, पक्षाचा हाेतकरु व प्रामाणिक नेता म्हणून त्यांची ख्याती होती.
राहुल गांधी यांचे विश्वासु म्हणून त्याना अनेक राज्यांची जबाबदारी दिली होती आणि ते ती जबाबदारी सक्षमपणे पार पाडत हाेते, युवक काॅंग्रेसच्या कारिकर्दीत त्यानी त्यांच्याकडे युवक नेत्यांचा माेठा संग्रह उभा केला. काॅंग्रेस नेतृत्वाचा त्यांच्यावर प्रचंड माेठा विश्वास हाेता. त्यांना खूप चांगले भवितव्य हाेते. राहूल गांधी यांनी काॅंग्रेसची पुर्नरचना करताना युवक काॅंग्रेसमध्ये कामगिरी बजावलेल्यांना मोठी संधी दिली. त्यामधील खासदार राजीव सातव हे एक होते.
माझ्या माहितीप्रमाणे ते राष्ट्रीय युवक काँग्रेसचे महाराष्ट्रातील पहिलेच राष्ट्रीय अध्यक्ष असावेत. अश्या ह्या एकजिनसी युवा नेतूत्वाला आज आम्ही मुकलो आहोत, परंतु सातव यांचे संसदेमधील कार्य उत्तम हाेते. किंबहुना ते आदर्श संसदपटू होते, खरंतर त्यांनी काँग्रेस पक्षाच्या कामासाठी वाहून घेतले हाेते. त्यांना देखील खूप चांगले भवितव्य हाेते. त्यांची प्रकृती ठीक होईल असे आम्हांला वाटले हाेते. परंतु न होणे असे अघटीत घडले, मी दुःखी झालो, राजीव सातव यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी आणि माझा राष्ट्रीय समाज पक्ष सहभागी आहे. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.