गडचांदूर पोलिस आणि पो.नि. गोपाल भारतीचा अवैध व्यावसायिकांना आशिर्वाद !





गडचांदूर (वि.प्र.)
गडचांदूर पो.स्टे. चे निरीक्षक असलेले गोपाल भारती यांचा आशीर्वादामुळे गडचांदूर शहरात अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात फोफावले आहे. दारू तस्करीपासून तर कोंबडबाजार, सड़ा, जुआ अड्डे यांना याठिकाणी ऊत आला आहे. तिन वषपिक्षा अधिक काळापासून गोपाल भारती या पो.स्टे. पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत आहे. त्यांची झालेली बदली ही त्यांनी आपल्या वशिल्यातून पुढे ढकलले असल्याचे सांगण्यात येते. नुकतेच युवा स्वाभिमान पार्टीचे सुरज ठाकरे यांनी गडचांदूर शहरामध्ये सुरू असलेल्या सहा व जुगार अड्ड्यांचे ऑन-दि-स्पॉट व्हिडीओ चित्रण करुन पोल-खोल केली. यासंदर्भात गडचांदर एसडीपीओ सशिलकमार नायक यांना ही त्यांनी यासंदर्भात तक्रारीतुन कळविले आहे. सट्टा चालत असलेल्या ठिकाणी ऑन-दि-स्पॉट येण्यासंबंधात त्यांनी भ्रमणध्वनीवरून कळविले परंतु एसडीपीओ नायक हे आपली टिम त्या जुगार अड्ड्यावर पाठवू शकले नाही. मागील एक वर्षापुर्वी गडचांदूर चे एसडीपीओ म्हणून सुशिलकुमार नायक रूजू झाले. नायक आल्यानंतर गडचांदुरातील अवैध व्यवसायावर आळा बसेल असे वर्तविल्या जात होते. परंतु त्याविरोधात घडले. गोपाल भारती यांचा या अवैध व्यावसायिकांना आशिर्वाद असल्याचा आरोप सुरज ठाकरे यांनी केला आहे.





"तो जुगार कोणाचा?"

सुरज ठाकरे यांनी व्हिडीओ चित्रण केलेल्या एका व्हिडीओमध्ये एका जुगार अड्यावर सट्टा-पट्टीच्या चिठया, दारूच्या बाटल्या, बावण पत्त्यांचे केंट, ग्राहकांना आरामासाठी गद्या, आलिशान लावलेले कुलर असा सोयीयुक्त 'हब' गडचांदूर मध्ये सुरू असल्याचे दिसत आहे. या जुगार अड्यावरील सारेचं त्याठिकाणाहुन पळून गेले होते. 'हा' जुगार अड्डा गडचांदूर मधील चार व्यक्ती चालवित असल्याचे सांगण्यात येते. यातील दोघांचा संबंध सरळ राजकारणाशी येतो, तर दोघे येथील प्रतिष्ठित व्यक्ती आहेत, असे समजते. हा जुगार अड्डा कुणाचा हे सांगण्याची गडचांदूरकरांना आवश्यकता नाही. पो. नि. गोपाल भारती यांना ही याची पूर्ण कल्पना आहे. यात संशय नाही. गडचांदूर मध्ये स्वतःला पांढरपेशा राजकारणी म्हणवून घेणारे अनेक जण आता अवैध व्यवसायात उतरले आहे. पडद्यामागची भुमिका बजाविणाऱ्या या राजकारण्यांवर कारवाई करण्याची हिंमत' गोपाल भारती मध्ये नाही म्हणून ते त्याची किंमत घेऊन या अवैध व्यावसायिकांना आशिर्वाद देत आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. गडचांदर शहर व शहराच्या आजुबाजुच्या परिसरात सुरू असे अनेकजण आहेत, त्याबद्दल यापूर्वी वृत्ताच्या माध्यमातून आम्ही उजेडात आणले आहेत.
स्पर्धा जुन्या व नव्या अवैध व्यावसायिकांची !
१ एप्रिल २०१५ ला दारूबंदीनंतर गडचांदूर शहरात अनेकांनी अवैध दारूविक्री च्या व्यवसायात आपले पाय रोखले. तेलाणा राज्य जवळचं असल्यामुळे तेलंगानातून दारू आणायची आणि ती बिसायची या व्यवसायात अनेकांनी आपले पाय मजबुत केले. काही नताशा राजकारण्यांची याठिकाणी पार्टनरशिप आहे. ज्या नव्या गड्यांनी यात प्रवेश केला, त्यांची किंमत मिळाली नाही तर त्यांचेवर कारवाई केली जाते. हे जुने कोण व नबिन कोण याची गडचांदुर पोलिसांना व पो.नि. भारती यांना याची संपूर्ण कल्पना आहे. त्याचप्रमाणे सट्टा व जुगाराचे याठिकाणी जुने किंग आहेत. सट्टा व जुगराचा पारंपारिक व्यवसाय समजणान्यांना आता या क्षेत्रात पैशाच्या लालसोने व राजकीय वरदहस्ताने आलेले नवे गडी स्पर्धक झाले आहेत. नबिन गडी आता जुन्या गडी चे व्यावसायिक स्पर्धक झाले आहेत. त्यांचा काटा काढण्यासाठी ते जुने गडी कोणत्याही स्तरावर जावू शकतात. ही बाब गडचांदूरसाठी दुर्भाग्याची ठरणारी आहे. त्यावर आत्तापासून नियंत्रण असणे गरजेचे आहे.