घोडेवाही येथे भारतीय क्रांतिकारी दिव्यांग संघटनेतर्फे दिव्यांग मार्गदर्शन मेळावा.




सावली : - शोषित, पिडीत, निराधार, विधवा, वृद्ध, मुकबधिर,अपंगाच्या न्याय ह्क्कासाठी लढणारी जिल्ह्यातील एकमात्र संघटना म्हणून जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे. त्या भारतीय क्रांतिकारी दिव्यांग संघटना तर्फे सावली येथील घोडेवाही येथे "दिव्यांग मार्गदर्शन मेळावा " दिंनाक 10 मार्च 2021 ला भारतीय क्रांतिकारी संघटनेचे उपाध्यक्ष टेरेन्स कोब्रा याचे अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
कार्यक्रमाचे उद्घाटक मुकद्दर मेश्राम, प्रमुख अतिथि वनसरेजी, पोंभूर्णा तालुकाध्यक्ष रफिक कुरेशी होते.
पाहुण्यांनी दिंव्यागाना मार्गदर्शन केले. शासकीय योजनांची माहिती दिली. कार्यक्रमापूर्वी विचार मंचावरच जनता दरबार सुरू केला. लोकांनी ज्वलंत प्रश्न मांडलीत. दिव्यांगाच्या समस्यासंदर्भात चर्चा करण्यात आली.
या प्रसंगी भारतीय क्रांतिकारी दिव्यांग संघटनेचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी सावली तालुका अध्यक्ष मनोज शेंडे, संगम गेडाम, प्रदीक गेडाम, गौरव मेश्राम, भुमिका मुनघाटे,वासेकर जी इत्यादी कार्यकर्त्यानी सहकार्य केले.