▪️ Editor - Sanjay Kannawar ▪️ Mobile - 9158399455

एलसीबीने जप्त केला ३३ लाखाचा मुद्देमाल दारूतस्कराला अटक; शहर, रामनगर ठाणे हद्दीत कारवाई



चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दारू जप्तीच्या दोन कारवाया केल्या. या कारवाइत दारूसाठा आणि दोन वाहने असा सुमारे ३३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. एका चालकाला अटक करण्यात यश आले. तर, दुसरा चालक फरार आहे. विनोद आडे राहनार वर्धा असे अटकेतील एका चालकाचे नाव आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्त्वात करण्यात आली.
जिल्ह्यात दुसèया जिल्ह्यातून दारूतस्करी होत असल्याच्या तक्रारी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर खाडे यांनी दारूतस्करीवर आळा घालण्यासाठी विशेष पथके गठित केली आहेत. शहर पोलिस ठाणे हद्दीतील छोटा बाजार चौकातील एका गल्लीत बेवारसस्थितीत असलेल्या वाहनात दारूसाठा असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने छापा टाकून वाहनाची तपासणी केली. त्यात ११५ पेट्या देशी दारू, २४ पेट्या विदेशी दारू आढळून आली. पोलिसांनी वाहन आणि दारूसाठा जप्त केला. चालक, मालकाचा शोध सुरू असून, शहर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर, दुसरी कारवाई रामनगर पोलिस ठाणे हद्दीतील जनता कॉलेज चौक परिसरात करण्यात आली. चारचाकी वाहनाने दारूची तस्करी होत असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी पाठलाग करून वाहन पकडले. वाहनाची चौकशी केली असता त्यात विदेशी दारूच्या ४४ पेट्या आढळून आल्या. यावेळी वाहन चालक विनोद आडे याला अटक केली. त्याच्याविरुद्ध रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्त्वातील पथकाने केली.