धनगर समाजाने संघटित राहून संघर्ष करावा -- ज्योती दरेकर



भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकाराचा उपयोग करण्यासाठी धनगर समाजाने संघटित राहून न्यायालयीन लढा यशस्वी करण्यासाठी संघर्ष करावा असे आवाहन महाराणी अहिल्याबाई समाज प्रबोधन मंच चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष ज्योती शंकर दरेकर यांनी केले.
राजुरा येथे धनगर समाजातील महिलांनी एकत्र येऊन भवानी माता मंदिर राजुरा येथे हळदी कुंकू व स्नेहन मिलन मेळावा आयोजित केला त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.अध्यक्षस्थानी संध्या ढवळे होत्या.धनगर समाजातील महिलांनी चूल आणि मुल एवढ्या पुरतेच मर्यादित न राहता घराबाहेर पडले पाहिजे आपल्याला आवडेल त्या क्षेत्रात काम सुरू केले पाहिजे.शिक्षणाचा फायदा व्यक्तिमत्त्व विकास करण्यासाठी करावा असे आवाहन संध्या ढवळे यांनी केले . हळदी कुंकू याचे महत्व आणि परंपरा याची सविस्तर माहिती इंदिराताई येवले यांनी आपल्या भाषणात दिली.जिल्हा सचिव सूनंदाताई कन्नमवार यांनीही आपले मनोगत व्यक्त करतांना नेहमी सकारात्मक असावे असे सांगितले .या महिला मेळाव्यात विविध स्पर्धा आयोजित केल्या.महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.सायंकाळी बळीराम खुजे सर ( माजी तालुका अध्यक्ष) यांच्या अध्यक्षतेखाली बक्षीस वितरण कार्यक्रम झाला त्यावेळी समाजाने संघर्षासाठी तयार राहण्याचे आवाहन केले. याप्रसंगी महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष कैलास उराडे यांनी न्यायालयीन केस विषयी सविस्तर माहिती देवून लढा यशस्वी करण्यासाठी तनमनधनाने सहकार्य करावे असे विनंतीवजा आवाहन केले . ध्येय निश्चित करून प्रामाणिक प्रयत्न केले तर यश खात्रीने मिळते असे मत संजय चीडे यांनी व्यक्त केले. महिलांनी पुढाकार घेऊन दरवर्षी असे विधायक कार्यक्रम आयोजित करावे आम्ही सदैव आपल्या पाठीशी आहे असे प्रतिपादन रुपेश चीडे यांनी केले. व्यासपीठावर भाऊराव खाडे, दिनेश पोतले, रवींद्र येवले, बाळू कापडे, सुधिरभाऊ घुरडे, धनंजय डवरे,गोसाई गोखरें,चंद्रशेखर तेलंग, सुमनबाई मसाळे, सुधाताई चिडे,छायाताई बुरांडे, सुमनताई गोखरे , अंजनाबाई झाडे उपस्थित होते . या स्पर्धेतील विजेत्या श्रावणी पोतले, समृध्दी पेंटे, माधुरीताई मसाळे, अर्चनाताई महात्मे, वैशाली चिडे ,ज्योत्स्ना ठमके, वनिता चिडे , उर्मिला चीडे, रीता शेरकी यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी द्रौपदी पोतले, वनिता उराडे, वनिता चीडे , सुनीता कोरडे, दर्शना पोतले, संध्या कापडे,प्रतिभा दवंडे,कल्पना झाडे, अंकिता खुजे , प्रतिमा बुरांडे , अश्विनी खुजे  यांनी अथक प्रयत्न केले.प्रणाली तुराळे/बुरांडे यांनी उत्कृष्ट संचलन करून कार्यक्रमाचा दर्जा वाढविला. सर्वांचे आभार वनिता चिडे यांनी मानुन कार्यक्रमाची सांगता केली. विशेष म्हणजे सोहम नंदगावडे या बालकाने योगा चे प्रदर्शन करून सर्वांचे मन मोहून घेतले.