▪️ Editor - Sanjay Kannawar ▪️ Mobile - 9158399455

मराठी पत्रकार संघाच्या तालुका अध्यक्ष पदी वेदांत मेहरकुळे , तर सचिवपदी शेखर बोंगीरवार



गोंडपिपरी - तालुका प्रतिनिधी
स्थानिक संदीप रेस्टॉरन्ट येथे पार पडलेल्या एका बैठकीत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ शाखा गोंडपिपरी ची कार्यकारिणी नुकतीच गठित करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ जिल्हाध्यक्ष चंद्रपूर सुनील बोकडे यांच्या आदेशानुसार येथील संदीप रेस्टॉरन्ट येथे बैठक घेण्यात आली. आयोजित बैठकीस ज्येष्ठ पत्रकार सुनील डोंगरे यांचे अध्यक्षतेखाली विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यादरम्यान तालुका कार्यकारिणीची घोषणा करताना तालुकाध्यक्षपदी दैनिक लोकमतचे तालुका प्रतिनिधी वेदांत मेहरकुळे यांची सर्वानुमते तालुका अध्यक्ष म्हणून निवड करण्यात. तर उपाध्यक्ष म्हणून पुण्यनगरी तालुका प्रतिनिधी सुनील संकुलवार, सचिव पदी शेखर बोंगिरवार, कार्याध्यक्षपदी कुणाल गायकवाड, संघटक म्हणून नागेश ईटेकर, कोषाध्यक्षपदी अमित उईके, तर सदस्य म्हणून चेतन मांदाडे ,प्रमोद दुर्गे, शरद कुकूडकर यांची निवड करण्यात आली. यानंतर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे ध्येयधोरण व विविध विषयांवर चर्चा करून आगामी कार्यक्रमाच्या प्रयोजना बाबत नियोजन करण्यात आले. तालुका कार्यकारणी च्या घटनानंतर पदाधिकार्‍यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे.