▪️ Editor - Sanjay Kannawar ▪️ Mobile - 9158399455

माणिकगड सिमेंट कडून होत असलेले धुळीचे प्रदूषण बंद करा !



गडचांदूर -- चंद्रपूर जिल्ह्यात अनेक सिमेंट उद्योग असून नेहमी कोणत्या ना कोणत्या चर्चेने नावाजलेली सिमेंट कम्पनी म्हणजे माणिकगड सिमेंट कम्पनी आहे.मागील 30 वर्षा पूर्वी गडचांदूर येथे उदयास आलेली तेव्हा येथिल जनतेला वाटले की आपल्या मुलांना नौकरी मिळेल,शहर सुसज्ज होतील.मोठे रुग्णालय निर्माण करतील व जनतेला त्याचा लाभ मिळतील विकास कामाला सीएसआर चा फंड मिळतील परन्तु या मुजोर कँपणीने असे कुठलेही काम केले नसून उलट जनतेला डस्ट व ध्वनी प्रदूषण करून जनतेला हैराण करण्याचे काम करीत आहे.सदर कँपणीला लागूनच असलेले साईशांती नगरातील नागरिक तर यांच्या ध्वनी व डस्ट प्रदूषणा मुळे त्रस्त झाले आहे सकाळी उठताच डस्ट साफ करण्यात वेळ जातात घरा समोर असलेले वाहन वा इतर कुठले सामान पूर्णतः खराब होत आहे नागरिकांच्या आरोग्य धोक्यात आले असून या ठिकाणचे नागरिक श्वास,दमा,त्वचा,डोळे,सर्दी इत्यादी आजाराने हैराण झाले आहे.अनेकदा प्रदूषण विभाग,तथा जिल्हाधिकारी ,शासनाला पत्र व्यवहार करूनही याकडे अक्षरशा दुर्लक्ष होत आहे.तेव्हा आज साईशांती नगरातील रहिवासी माजी नगराध्यक्ष सौ विजयालक्ष्मी डोहे व इतर शकंडो महिला नगर परिषद कडे धाव घेऊन मुख्याधिकारी तथा नगराधक्ष्य सौ सविताताई टेकाम यांना निवेदन दिले व आपण तरी याकडे लक्ष घालावे व प्रदूषण विभाग,निरी विभाग,तथा मंत्री महोदयाकडे पाठपुरावा करून होत असलेले प्रदूषण बंद करावे.
तसेच साईशांती नगरात मागील सन 2012 पासून जलशुद्धीकरण व पाण्याच्या टाकीचे काम चालू होते व ते काम मागील दीड -दोन वर्ष पूर्वी पूर्णत्वास आले व सरकारी पॉईंट द्वारे पाणी पुरवठा चालू आहे परन्तु नगर परिषद नि सदरची योजना अजूनही नगर परिषदला हस्तांतरण करण्यात आली नाही.त्यामुळे जनतेला घरगुती नळ कनेक्शन दिल्या जात नाही घरगुती बोरवेल ला खूप जास्त DTS असल्याने सदरचे पाणी पिण्यायोग्य नाही त्यामुळे जलशुद्धीकरण केंद्र नगरपरिषद ला हस्तांतरण करून तात्काळ नळ कनेक्शन देण्यात यावे असे सुद्धा निवेदन देण्यात आले तेव्हा येथील मुख्याधिकारी यांनी गेलेल्या महिला सोबत समाधानकारक बोलून पाठपुरावा करण्याचे अस्वासन देऊन निवेदन घेतले.नगराध्यक्षांनी मात्र उडवाउडवीचे उत्तर देऊन असमाधान कारक उत्तर दिले यापुढे तरी लोकप्रतिनिधी म्हणून खरोखरच पाठपुरावा करून जनतेला डस्ट प्रदूषणा पासून मुक्त करतील की काय याकडे सर्व जनतेचे लक्ष लागले आहे