आधारभूत कापुस खरेदी केंद्र सुरु,रु. ५८२५ व ५५१५ दराने खरेदी. शेतकऱ्यानी लाभा घ्यावा- अतुल गण्यारपवार




गडचिरोली जिल्हयात चामोर्शी तालुक्यात आस्था जिनिंग अॅन्ड प्रेसिंग इंडस्ट्रीज मौजा. अनखोडा येथे शासनाचे आधारभूत किमंत योजने अंतर्गत महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ विभागीय कार्यालय वणी यांचे मार्फत मे. आस्था जिनिंग अॅन्ड प्रेसिंग इन्डस्ट्रीज अनखोडा येथे कापूस खरेदीला दिनांक २८/१२/२०२०. रोजी सुरुवात झाली आहे.
अतुलभाऊ गण्यारपवार सभापती कृषि उत्पन्न बाजार समिती चामोर्शी यांनी कापुस खरेदीला भेट देवुन कापुस केंद्राची पाहणी केली. शासनाचे आधारभूत कापुस दर लांब धागा रु. ५८२५ व मध्यम धागा कापुस रु. ५५१५ आहे. तर प्रायवेट मध्ये खाजगी व्यापारी रु ४५०० ते ४८००च्या दराने कापुस खरेदी करीत असल्याची चर्चा आहे. तरी कापुस उत्पादक शेतकऱ्यांनी शासनाचे आधारभूत कापुस खरेदी केंद्रावर कापुस विक्री करीता आणावे. ज्या शेतकऱ्यांनी कापुस विक्री करीता बाजार समिती चामोर्शी बडे नांव नोंदणी केली असेल त्यांना कापूस विक्री करीता आनण्याकरीता बाजार समिती कडुन फोन व्दारे कळविण्यात येईल. ज्यांनी कापूस विक्रीची नोंद बाजार समितीकडे केली नाही त्यांनी बाजार समिती चामोर्शी किंवा शेतमाल तपासनी नाका आष्टी तसेच आस्था इंडस्ट्रीज मध्ये कृउबास लिपीक श्री शेंडे येथे हंगाम २०२०-२१ चा कापुस पेरा नोंद असलेला सातबारा, गाव नमुना ८ अ, आधारकार्डची छायाप्रत, तसेच पासबुकच्या पहिल्या पानाची छायाप्रत व बँक खात्याला लिंक असलेला मोबाईल नंबर देवुन नांव नोदणी करावे. ज्या जिल्हयातील व इतर भागातील शेतकऱ्यांना नोंदविण्या करीता येण्यास अडचन आहे अशांनी श्री, टाकळा वाट्सअॅप नं. ९७६५७०५५१८ श्री, कोकावार ९८२३६०४००७, श्री, शेंडे ९४०३२३८२५९ या नंबरवर वाटअप करुन नोंदणी करावी. असे आव्हाहन मा. अतुलभाऊ गण्यारपवार सभापती कृषि उत्पन्न बाजार समिती, चामोर्शी यांनी केले आहे. भेटीच्या वेळी · कापूस महासंघाचे प्र. व्यवस्थापक आटे, ग्रेडर डोईजड, तसेच बाजार समिती चामोर्शीचे सचिव निलेश पिंपळकर, सांख्यिकी, प्रकाश शिवनीवार, लिपीक, विजय शेंडे आस्था इन्डस्ट्रीजचे मालक मनोहर बोधनवार, राजु बोधनवार उपस्थीत होते.