▪️ Editor - Sanjay Kannawar ▪️ Mobile - 9158399455

गडचांदूर च्या "त्या" नगसेवकाच्या सदस्यपदावर निलंबनाची "टांगती तलवार !"



गडचांदूर (विशेष वार्ता.)
नुकतेच काही महिन्यापूर्वी गडचांदूर नगरपरिषदेची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांचे अध्यक्ष व उपाध्यक्ष विराजमान झाले. सत्ता स्थापनेनंतर स्वीकृत नगरसेवक पदासाठी काँग्रेसकडून एक शिवसेनेकडून एक असे स्विकृत सदस्य नियुक्त करण्यात आले. यामधील एका सदस्याने बनावट दस्तावेज सादर केल्यामुळे त्या नगरसेवकाचे सदस्यपद आता धोक्यात आले असून सादर केलेल्या दस्तावेजांची संपूर्ण चौकशी करण्यात यावी व त्या स्वयंभू नेत्याचे नगरसेवक पद रद्द करून त्याच्यावर धोखाधडी चा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाने नुकतेच नगर विकास मंत्रालय, विभागीय आयुक्त व चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रार सादर केली आहे.
विविध कारणाने नेहमीच चर्चेत असलेले असणारा हा स्वयंभू मोठा (?) नेता गडचांदूरात नेहमीच या ना त्या कारणाने चर्चिला जात असतो. काही दिवसांपूर्वी संचारबंदीच्या काळात त्याच्या Facebook status वरून चांगलेच रान माजले होते. त्यावेळीही अश्या समाजसेवकांना पदावर राहण्याच्या काही अधिकार नाही व त्यांंना पदावरून निलंबित करावे अशी मागणी विरोधी पक्ष व समाजसेवकाकडून लावून धरण्यात आली होती. आपल्या वाह्यात गुण व स्वभावामुळे हा नगरसेवक व स्वयंभू नेता पक्षासाठी डोकेदुखी ठरत आहे. आपले राजकीय वलय मोठे आहे असे दाखविणारा हा स्वयंभू नेता आता स्वतः वादाच्या भोवऱ्यात सापडला असून त्याच्या कागदपत्राची योग्य चौकशी झाल्यास त्याचे नगरसेवक पद रद्द होऊन शासनाची दिशाभूल केली म्हणून त्याच्यावर गुन्हाही दाखल होण्याचे संकेत मिळत आहे.