आपलं खापर लपविण्यासाठी अधिकाऱ्यांची उचलबांगडी-आ. मुनगंटीवार




चंद्रपूर : सोमवार दि. १० आॅगस्ट रोजी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांच्या आकस्मिक बदलीचे धक्कादायक वृत्त चंद्रपूरात धडकले आणि अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. सर्वांना उपलब्ध होणारे मृदु स्वभावाचे अधिकारी म्हणून त्यांची चंद्रपूरात कल्याणी होती. सध्या देशावर कोरोनाचे भयावह संकट कोसळले आहे. कोरोना च्या सुरूवातीच्या जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यात वैद्यकीय क्षेत्रातील जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांचा सिंहाचा वाटा होता. जिल्हा आज कोरोनाच्या भयावह स्थितीमध्ये असतांना खेमणार यांची बदली होणे, ही बाब चिंताजनक असल्याची अनेकांनी प्रतिक्रीया दिली आहे. कोरोना काळात चंद्रपूरचे विद्यमान जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांची अचानक बदली झाल्यामुळे राजकीय-प्रशासकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.
नवी मुंबईतील ‘जलस्वराज्य प्रोजेक्ट’चे प्रकल्प व्यवस्थापक अजय गुल्हाने यांची चंद्रपूरच्या जिल्हाधिकारीपदी वर्णी लागली आहे. अजय गुल्हाने हे 2010 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.

आपलं खापर लपविण्यासाठी अधिकाऱ्यांची उचलबांगडी-आ. मुनगंटीवार
कोरोना काळात जिल्हाधिकारी खेमणार यांची बदली करणे योग्य नाही, त्यांचं काम कौतुकास्पद, जिल्हयातील कोरोना परिस्थिती त्यांनी उत्तम प्रकारे हाताळली. या परिस्थितीत त्यांची झालेली बदली चुकीची आहे, अशी प्रतिक्रीया माजी वित्तमंत्री व आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. कमीतकमी कोरोना सारख्या महामारी मध्ये अधिकाऱ्यांची उचलबांगडी करणे योग्य नसल्याचे म्हटले आहे, खेमणार हे स्वतः डॉ आहे ज्यावेळी देशात कोरोना महामारी सारखा वाढत होता त्यावेळी त्यांनी जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव होऊ दिला नाही, चांगल्या अधिकाऱ्यांप्रमाणे त्यांनी ती परिस्थिती उत्तम प्रकारे हाताळली. कोरोना काळात ज्या नागरिकांचा मृत्यू झाला त्याची संपूर्ण जबाबदारी ही सरकारची आहे, आपलं खापर लपविण्यासाठी अधिकाऱ्यांची उचलबांगडी केल्या गेली असल्याची प्रतिक्रीया आ. मुनगंटीवार यांनी याप्रसंगी दिली.