रायुकॉंचे शहर अध्यक्ष आकाश वऱ्हाडे यांच्यासह सहा जणांना अटक


उपविभागीय पोलिस अधिकारी विलास यामावार यांनी केली कारवाई!
गडचांदूर चे पो.नि. गोपाल भारती यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह!
जुगारावर धाडी, दारूविक्रेत्यांना मात्र "भारती" यांचा आशिर्वाद?
माहिती देण्यास गडचांदूर पोलिसांची टलवाटलव, कर्तव्यापेक्षा हितसंबंध जोपासण्यासाठी गडचांदूर पोलिसांची कसरत!

माहिती देण्यास गडचांदूर पोलिसांची नेहमीचीचं टलवाटलवी ?
सदर जुगार प्रकरणी माहिती मिळावी यासाठी सकाळी दहा वाजता गडचांदूर पोलीस स्टेशनच्या दूरध्वनीवर फोन करून सदर प्रकार स्टेशन डायरी वर उपस्थित असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यास विचारला असता त्यांनी आम्ही माहिती देऊ शकत नाही, आपण तपास अधिकारी शिंदे यांच्याशी संपर्क करावा असे स्पष्ट सांगून शिंदे यांचा नंबर दिला. लगेच तपास अधिकारी शिंदे यांचेशी संपर्क केला असता त्यांनी सरळ उपविभागीय पोलिस अधिकारी विलासजी यामावार यांच्याशी थेट संपर्क करायला सांगून माहिती देण्यास स्पष्ट नकार दिला. जुगार प्रकरणाची माहिती मिळावी यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी यामावार यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबतीत कोणतेही सहकार्य केले नाही, ही दुर्देवी बाब आहे. एखाद्या गुन्ह्याची एफआयआर झाल्यानंतर त्याची माहिती वृत्तपत्रांना उपलब्ध करून दिल्यास प्रकरणात पारदर्शकता राहते, परंतु गडचांदूर पो.स्टे. मध्ये याच्या विपरीत होत असते. यापूर्वीही अनेकदा असा अनुभव आला असून नुकतेच काही दिवसांपूर्वी सुगंधी तंबाखू वर केलेल्या कारवाईच्या संदर्भात माहिती देण्यात करण्यात आलेली लपवाछपवी गडचांदूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गोपाल भारती यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे.
(गडचांदूर वार्ता)
रविवार दि. 17 मे रोजी रात्री उशिरा गडचांदूर येथील फिज्जु चिकन सेंटर च्या मागे असलेल्या एका खोलीवर उपविभागीय पोलिस अधिकारी विलासजी यामावार यांच्या चमूने धाड टाकून गडचांदुरातील बड्या राजकीय धेंड्यांना जुगार खेळताना रंगेहात अटक केली. सोमवार दि. 18 मे रोजी पहाटे 2 वाजताच्या सुमारास गडचांदूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला. या जुगारात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस चे शहर अध्यक्ष आकाश वऱ्हाडे, नगरसेविकेचा मुलगा शेख अजमूद्दीन ख्वाजा, समाजवादी पक्षाचा युवा नेता विक्की मधुकर राठोड, संतोष देवाळकर, तुलसी पाल, शाहिद अली अन्सारुद्दीन व मोहम्मद आसिफ मोह. अफझल ह्यांना अटक करण्यात आली असून व्यवसायिक चालणाऱ्या या जुगारात 23 हजार रुपये नगदी व 6 दुचाकी वाहने जप्त करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

महत्वाचे म्हणजे गडचांदूर चे एसडीपीओ विलास यामावार यांनी जुगारावर केलेली ही शहरातील दुसरी कारवाई आहे. छोटीशी लोकवस्ती असलेल्या गडचांदूर शहरात जुगारावर ही उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी कारवाई करावी म्हणजे गडचांदूर चे पो. नि. गोपाल भारती व त्यांच्या चमुंच्या कार्यक्षमतेवर हा फार मोठा प्रश्नचिन्ह उभी करणारी बाब आहे. गडचांदूर शहरात जुगारावर उपविभागीय पोलिस अधिकारी यामावार यांच्या नेतृत्वात नुकत्याच दोन धाडी पडल्या असून शहराच्या चप्या-चप्प्यात मोठ्या प्रमाणावर तेलंगाना येथून आणलेली दारू विक्री होत असते. या दारू विक्रेत्यांना गडचांदूर पो.नि. भारती यांचा विशेष आशीर्वाद प्राप्त असल्यामुळे या प्रकरणाकडे गडचांदूर पोलीस जाणीवपूर्वक डोळेझाक करीत असल्याचे सांगितले जाते. नुकतेच काही दिवसांपूर्वी जिवती पोलिसांनी गडचांदुर ला येणारा दारूसाठा जप्त केला गडचांदूरातील युवकांवर कारवाई केली. त्याचप्रमाणे राजुरा पोलिसांनी तेलंगणा सिमेवर गडचांदुर येथील मद्यसम्राटाला तेलंगाना येथून लाकडाॅऊनमध्ये दारूचा साठा आणतांना त्याच्या मोठ्या चार चाकी वाहनासह अटक केली, अगदी पोलीस चौकीच्या नाकासमोर हा मद्यसम्राट खुलेआम दारूचा व्यवसाय करीत होता व अद्यापही आहे. जिवती व राजुरा पोलीस गडचांदूर येथे येणारा दारूसाठा जप्त करू शकतात मग गडचांदूर चे पो.नि. गोपाल भारती यांचे "डोळे" या दारू प्रकरणात मिटले कसे गेले आहेत? याचा तपास पोलीस अधिक्षकांनी अवश्य करायला हवा.