31 मे रोजी दीपोत्सव करून घरोघरी साजरी करावी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती - डॉ.तुषार मर्लावार




दरवर्षी 31 मे रोजी संपूर्ण भारतात राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती समारंभपूर्वक जल्लोषात व मोठ्या उत्साहात साजरी केली जाते . यावर्षी कोरोना महामारी च्या लॉकडाऊन मुळे पुण्यश्लोक अहिल्यादेवी जयंती सार्वजनिक रित्या साजरी करणे अडचणीचे आहे . म्हणून " या शुभ प्रसंगी 31 मे ला आपण सर्व परिवारातील सदस्य आपल्या घरीच जयंती साजरी करू या ; सकाळी 9 वा . पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या प्रतिमेचे किंवा मूर्तीचे पूजन व माल्यार्पण करावे तसेच रात्री ठीक 8 वा . आपल्या घरासमोर कमीत कमी 5 दीप प्रज्वलित करून हा सोहळा भव्य दिव्य करावा " असे आवाहन डॉ.तुषार मर्लावार यांनी केले आहे . राजमाता अहिल्यादेवी यांचे कार्य सर्वश्रुत आहे . परंतु त्यांची काही वैशिष्ठ्ये आज ही मानवी जीवन बदलू शकतील , मानवतेचा संदेश विश्वात प्रसारित करू शकतील , त्याबद्दल काही अंश : 28 वर्षे शांततापूर्ण व लोककल्याणकारी , न्यायपूर्ण मार्गाने राज्य चालवणा - या सशक्त महिला राज्यकर्त्या होत्या . राजमाता अहिल्यादेवी अत्यंत कुशल प्रशासक म्हणून ओळखल्या जात होत्या . त्यांची न्यायप्रणाली अत्यंत आदर्श मानल्या जात होती . संपूर्ण देशात अहिल्यादेवींनी जागोजागी घाट बनविले , मंदिरांचा जीर्णोद्धार केला ; लोकांमध्ये नैतिक मूल्ये रूजविली . “ सद्गुणाला जात नसते अन् शौर्याला धर्म नसतो " असे सुंदर विचार त्यांनी विश्वाला दिले . " माझे कार्य प्रजेला सुखी करणे आहे . माझ्या प्रत्येक कृत्याला मी स्वतः जबाबदार आहे . " हे त्यांचे विचार त्यांच्या राजगादीच्या मागे लिहिलेले होते . आजच्या भाषेत त्याला आपण ( Mission Statement ) जीवन लक्ष कथन म्हणू शकू . पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर धनगर समाजाच्या होत्या . महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात मोठ्या प्रमाणात या भटक्या समाजाचे लोक राहतात . मेंढीपालन व शेळी पालन हे त्यांचे प्रमुख उद्योग आहेत . देशांच्या विविध भागात पाल , बघेल , गडरिया , कमरू , गायरी , पुर्बिया , कुरबा , कुरूमा , कुरुम्बर , ग्वाला , रेबारी , भरवाड , देवासी , मलधारी , गाडरी , गद्दी , गोला , कुरुम्बास , कुरुम्बर , गोंडा इत्यादी विविध नावांनी त्यांना ओळखले जाते . हे सर्व अहिल्यादेवींना आपले आदर्श व दैवत मानतात , त्यांचे पूजन करतात . राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीनिमित्त शत शत नमन . " इवलासा दीप माझा ... उजळेल सारी दुनिया अहिल्या मातेच्या सामर्थ्याने ... घडेल ही किमया " " डॉ.बाबासाहब के स्वप्न को संपूर्ण साकार करने का संकल्प "