▪️ Editor - Sanjay Kannawar ▪️ Mobile - 9158399455

राज्यातील तंत्र शिक्षण मंडळाचे परीक्षांचे वेळापत्रक जाहीर ; येत्या ९ जुलैपासून परीक्षा



पुणे  : राज्यातील तंत्रनिकेतनच्या अभियांत्रिकी, औषध निर्माण शास्त्र पदविका अभ्यासक्रमासह इतर पाच अभ्यासक्रमांच्या शेवटच्या सत्राच्या व शेवटच्या वर्षीची परीक्षा येत्या ९ जुलैपासून घेण्यात येणार असून परीक्षेचा निकाल ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला जाणार आहे,असे तंत्र शिक्षण मंडळातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

 करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने सर्व अभ्यासक्रमाच्या शेवट्या सत्र किंवा अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याचे आदेश दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर तंत्रशिक्षण मंडळाच्या विद्वत समितीची बैठक नुकतीच पार पडली. त्यात विविध परीक्षा कोणत्या पद्धतीने घ्यायच्या याबाबत नियोजन करण्यात आले. त्यावर मंडळाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर  महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाने परीक्षांचे वेळापत्रक प्रसिध्द केले असून त्यात सहा सत्राच्या पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रमातील सहावे सत्र, दोन वर्षाच्या औषधनिर्माण अभ्यासक्रमातील द्वितीय वर्ष, तीन वर्षाच्या मायनिंग अभ्यासक्रमातील तृतीय वर्ष, आठ सत्राच्या पार्टटाईम पदविका अभ्यासक्रमातील आठवे सत्र आणि शासन मान्य अल्प मुदतीच्या अभ्यासक्रमाचे अंतिम सत्र या अभ्यासक्रमाच्या परीक्षा घेतल्या जाणार असल्याचे नमूद केले आहे.