▪️ Editor - Sanjay Kannawar ▪️ Mobile - 9158399455 ▪️ RNI No. MAHMAR/2011/37424/

आ. मुनगंटीवार यांच्यासारखा लोकनेता आम्हाला लाभला हे आमचे भाग्य : नगराध्यक्षा सौ रत्नमाला भोयर*लॉकडाऊन घोषित झाल्यापासून आजच्या दिवसापर्यंत आ. मुनगंटीवार यांनी गोरगरिबांना मदत देण्याचा उपक्रम सातत्याने सुरू ठेवला आहे. जिल्ह्यातील कोणत्याही भागातील गरीब उपाशी राहणार नाही या दृष्टीने स्वतः लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी भाजपच्या लोकप्रतिनिधीना दिल्यात , गरिबांना मदत पोहचविण्याची व्यवस्था केली. पोलिसांना सुरक्षा किट , गरजू रुग्णांना त्यांच्या घरापर्यंत पोहचविण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून देणे अशा विविध माध्यमातून त्यांनी जनतेला मदत केली. असा लोकनेता आम्हाला लाभला याचा आपल्याला अभिमान असल्याचे प्रतिपादन मुल च्या नगराध्यक्षा प्रा. रत्नमाला भोयर यांनी केले.

आज मुल शहरातील ऑटो रिक्षा चालकांना माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या वतीने जीवनावश्यक वस्तू व धान्य किट्स चे वितरण करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा सौ भोयर बोलत होत्या. नगर परिषदेचे उपाध्यक्ष नंदू रणदिवे , प्रभाकर भोयर , प्रशांत समर्थ , प्रकाश धारणे , दत्तपसन्न महादाणी, उज्वल धामनगे यांची यावेळी उपस्थिती होती.

लॉकडाऊन मुळे ऑटो रिक्षा चालकांना आर्थिक विवंचनेचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे त्यांनी आ. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे धान्य स्वरूपात मदत मिळावी अशी मागणी केली होती . आ. मुनगंटीवार यांनी त्वरित दखल घेत ऑटोरिक्षा चालकांना दिलासा दिला आहे. आज भाजप पदाधिकाऱ्यांनी ऑटोरिक्षा चालकांना जीवनावश्यक वस्तूंच्या किट्सचे वितरण केले. ऑटोरिक्षा चालकांनी आ. मुनगंटीवार यांचे यावेळी आभार व्यक्त केले. या आधी चंद्रपूर शहरातील ऑटोरिक्षा चालकांना सुद्धा आ. मुनगंटीवार यांच्या वतीने जीवनावश्यक वस्तू व धान्य किटचे वितरण करण्यात आले आहे