जिवनावश्यक सुविधा पुरवठा करणाऱ्या वाहनांसाठी ई पासेसची सुविधा

जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा देणाऱ्या

वाहनांसाठी ऑनलाईन ई-पासची सुविधा


चंद्रपूर,दि.4 एप्रिल: कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यामध्ये 14 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणारे वाहने व अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांसाठी आरटीओ मार्फत ई-पास देण्यात येणार आहे. यासाठी ऑनलाईन प्रणाली तयार करण्यात आली असून https://transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर संबंधित वाहनधारकांना अर्ज करता येईल.

जिल्ह्यामध्ये लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे औषधी दुकाने, दूध,भाजीपाला,अन्नधान्य इत्यादी विविध जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करण्यास मान्यता देण्यात आली आहे.परंतु,या वाहतुकीसाठी संबंधित वाहन धारकास प्रशासनाची मान्यता घेणे आवश्यक आहे. यासाठी आरटीओ कार्यालय यांच्यामार्फत अशा वाहनांना ई-पास देण्यात येत आहे. ही  ई-पास ऑनलाईन असल्याने https://transport.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर जाऊन संबंधितांनी अर्ज करून आपले ई-पास प्राप्त करून घ्यावे. प्राप्त अर्जाची पडताळणी करून संबंधित वाहनधारकांना ऑनलाइन प्रणाली वरूनच डाउनलोड करता येणार आहे. ई-पास च्या माध्यमातून वाहनधारक वाहतूक करू शकणार आहे.

अशी असणार ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया:

 https://transport.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर जाऊन अप्लाय फॉर गूड व्हेईकल सिलेक्ट करावे नंतर आरटीओ व्हेअर टू अप्लाय ठिकाणी एमएच 34 (चंद्रपूर) सिलेक्ट करावे. हे झाल्यानंतर वाहन मालकाचे नाववाहन चालकाचे नाववाहन चालक यांचे वैध लायसन्स क्रमांकवैध मोबाईल क्रमांक (चालक-मालक) व ईमेल आयडी,वाहन क्रमांक इत्यादी महत्त्वपूर्ण बाबी नोंदवावे.यानंतर वाहनाचे चेसिस क्रमांक शेवटचे 5 आकडेवाहनाचा प्रकार नोंदवावा. नंतर कोणत्या प्रकारचे माल वाहून नेणार आहे ते नोंदवावे (उदा.व्हेजिटेबलग्रेनग्रोसेरीज)माल वाहून नेण्यासाठी मार्ग नमूद करावा (उदा. चंद्रपूर ते मुंबई) नंतर ई-पास कालावधी नमूद करावा (एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी नसावादिलेल्या तारखे मधून निवडावा)नंतर वर्ड व्हेरिफिकेशन कॅरेक्टर भरून अप्लिकेशन सबमिट करावे यानंतर पाससाठी अप्लिकेशन रेफरन्स नंबर जनरेट होईल.

अप्लिकेशन क्रमांकानुसार आरटीओ ऑफिस ने मान्यता केल्यानंतर आपल्या वाहनाचा ई-पास जनरेट होईल व तो पीडीएफ स्वरूपात अर्जदाराच्या मेल आयडीवर पाठवण्यात येईल किंवा अर्जदारास प्रिंट घेता येईल.

परिवहन विभाग वगळता जिल्हाधिकारीपोलिस आणि पालिकेचे अधिकाऱ्यांमार्फत सुद्धा जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणारे वाहने व अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांसाठी पास देऊ शकतात. सेल्फ डिक्लेरेशन तसेच कोणत्याही शासकीय प्राधिकरणाद्वारे जारी केलेला पास वस्तूंच्या वाहतुकीसाठी पुरेसा आहे.

ई-पासच्या अधिक माहितीसाठी,मालवाहतूक करणाऱ्या वाहन चालकांना,मालकांना अडचण असल्यास त्यांनी आरटीओच्या 07172-272555 या क्रमांकावर किंवा  mh34@mahatranscom.in या ईमेल आयडीवर संपर्क करावा,असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी व्ही.एन.शिंदे यांनी केले आहे.