ही कसली व्यवस्था? परराज्यातून आलेल्यांची माहिती देणार कुणाला?

ही कसली व्यवस्था?
परराज्यातून आलेल्यांची माहिती देणार कुणाला?

चंद्रपूर प्रतिनिधी:-बुधवार दिनांक 29 एप्रिल ला रात्रो जवळपास साडे नऊ वाजताच्या दरम्यान भद्रावती वरून एका व्यक्तीचा फोन आला आणि त्यांनी त्यांचे घराशेजारी राहणारे एक व्यक्ती आंध्र प्रदेशमधून आज साडे आठच्या दरम्यान भद्रावती येथे आले, त्यामुळे परिसरांमध्ये भितीचे वातावरण पसरल्याची माहिती दिली दिली आणि या संदर्भात कुठे संपर्क करता येईल या संबंधात माहिती विचारली. भद्रावती तहसील कार्यालय झिरो 07175-265080 हा तहसिल कार्यालयाचा क्रमांक त्यांना दिला. या क्रमांकावर कॉल उचलत नसल्याची माहिती त्यांनी कळवली. त्यानंतरही या क्रमांकावर फोन करून स्वतः प्रत्यक्ष माहिती जाणून घ्यायचं प्रयत्न केला असता पुष्कळ call केल्यानंतर फोन उचलण्यात आला व 9850****12 या क्रमांकावर फोन करण्याचे सांगितले. भद्रावतीचे नायब तहसीलदार मधुकर काळे यांचा हा नंबर असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले व सदर माहिती त्याच नंबर वर कळविण्याचा सल्ला दिला. अनेक फोन केल्यानंतरही वरील नंबर वर फोन उचलण्यात आला नाही. परत 07175-265080 या नंबरवर कॉल करून शिलादेवी रोडवर परराज्यातून व्यक्ती आल्याची माहिती त्यांना कळविण्यात आली. सदर व्यक्तीच्या हातावर यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे होम कोरोनटाईन असा शिक्का मारण्यात आला असून सदर व्यक्ती ची माहिती संबंधितांना सांगण्यात आली. ठीक आहे उद्या बघू असे म्हणून कर्मचाऱ्यांनी फोन ठेवून दिला. बाहेरून आलेल्या रुग्णांची माहिती द्या ,असे चंद्रपूर जिल्ह्यात जिल्हाधिकारी आवर्जून सांगत आहेत, कळकळीची विनंती करीत आहे, परंतु त्यांचे अधिनस्त कर्मचारी फक्त सहा तासाची ड्युटी बजावत आहे. ही कसली व्यवस्था असेच म्हणण्याची वेळ आता सामान्य नागरिकांवर आली आहे. वरिष्ठ अधिकारी वेळोवेळी नागरिकांना योग्य ते निर्देश देत आहे सूचना करीत आहे यांची संपूर्ण माहिती जिल्ह्यातील सुज्ञ नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्यांना कळवावे कळवावी कळकळीची विनंती करीत आहे, परंतु ज्यांना माहिती कळवायची आहे. अधिकारी सूस्त आणि मस्त आहेत. यावर योग्य तो निर्णय, कारवाई जिल्हाधिकारी महोदयांनी अवश्य करायला हवा. अधिकाऱ्यांनी वरील माहिती संदर्भात प्रत्यक्ष चौकशी करावी आणि सुज्ञ नागरिकांना उत्तर कसे द्यायचे, समाधान कसे करायचे, याची समज अधिकारी व कर्मचाऱ्यांना द्यावी. भद्रावती चे नायब तहसीलदार मधुकर काळे यांना या प्रकरणाबद्दल योग्य ती समज द्यावी, असे या निमित्ताने सांगावेसे वाटते.