चंद्रपूर क्रांतीच्या वृत्ताने प्रशासनाला आली जाग !




चंद्रपूर (वि.प्रति.)चंद्रपूर थर्मल पावर स्टेशन मधील  उर्जानगर वसाहतीतील रस्ते खड्डेयुक्त झाले होते. या रस्त्यावर  मोठमोठे खड्डे पडल्याने रहदारीला तारेवरची कसरत करावी लागत होती. त्यामुळे दि.२६ नोव्हेंबर २०२५रोजी साप्ताहीक चंद्रपूर  क्राती वृत्तपत्रात व न्युज पोर्टल वर ''खड्ड्यात ऊर्जानगर वसाहत....!'' या आशयाचे वृत्त  प्रकाशित करण्यात आले होते. या वृत्तामुळे थर्मल पावर स्टेशन प्रशासन खडबडून जागे होत रस्त्याच्या डागडुजी ला सुरूवात केली आहे.

हेही वाचा

👇👇👇👇👇👇👇👇

https://www.chandrapurkranti.in/2025/11/blog-post.html

या वसाहतीतील रस्त्याची दरवर्षी लिपापोतीच्या नावाने करोडो रुपयाची कंत्राट  दिले जाते पुन्हा पुढल्या वर्षी त्या रस्त्याची तीच अवस्था बघायला मिळते. कंत्राटदार व सिटीपीएस अभियंता यांच्या मिली भगत ने नेहमी तात्पुरती माल सुताऊ धोरण राबविण्याची नेहमी अभियंत्यांची संकल्पना असते.यामध्ये कंत्राटदार अभियंते यांची मात्र चांदी होत असल्याचे बोलले जाते.निविदा मंजूर करण्यात येते मात्र महिन्याभरातच रस्त्यावर मोठमोठे खड्डे पहायला मिळते. वसाहतीतील  रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ते हेच कळेनासे झाले आहे. मात्र बातमीची दखल घेत प्रशासन मजबूत डांबरीकरण करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

ऊर्जा भवन ते मुख्य अभियंता यांच्या बंगल्यापर्यत पॉवर स्टेशनचे मुख्य अभियंता,उपमुख्य अभियंता,अधिक्षक व इतर कर्मचारी या रस्ताने येणे जाणे करीत असतात.या रस्त्यावर  मोठमोठे खड्डे पडले आहे.वर्षभरापूर्वीच या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते.मात्र महिन्याभरातच डांबरीकरण उकडून गेल्याने रस्त्यावर  मोठमोठे खड्डे पडले होते.प्रशासनाने याकडे कानाडोळा केल्याने वाहनधारकांना अडचणीचा सामना करावा लागला.

 रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असतानासुद्धा साधी चौकशी करण्यात आली नाही. चौकशी न केल्याने रस्त्याची गुणवत्ता काय असेल हे उघडपणे दिसून  येत आहे.